आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील आठवा \'फ्लायबॉय\' ठरला हृतिक रोशन, जाणून घ्या कसा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('बँग बँग' सिनेमातील एका दृश्यात हृतिक रोशन)
सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित 'बँग बँग' या सिनेमाचे यूएसपी त्याचे भव्य सादरीकरण आणि हृतिक रोशनचे स्टंट्स आहेत. या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान हृतिक गंभीर जखमी झाला आहे. त्याची ब्रेन सर्जरीसुद्धा झाली. याचकाळात तो सुझानपासून विभक्त झाला. याशिवाय 'शुद्धी' आणि 'पानी' हे दोन मोठे सिनेमे त्याच्या हातून निसटले.
एवढ्या नुकसानानंतरसुद्धा हृतिकने या सिनेमासाठी आपले सर्वस्व पणाला लावले. सिनेमातील सर्व स्टंट्स त्याने डमीचा वापर न करता स्वतः केले. विशेषतः फ्लायबॉय वॉटर स्पोर्ट्स. यामध्ये पायांना एक मशीन बांधली जाते जी वेगाने पाण्याचा प्रेशर मागे सोडते आणि मनुष्याला समोर ढकलते, त्याला हवेत उडवते. योग्य प्रशिक्षणानंतरच हे करणे शक्य होते. हृतिकने हा स्टंटसुद्धा स्वतः केला. या अॅडव्हेंचर स्पोर्टचे ट्रेनिंग घेणारा हृतिक जगातील आठवी व्यक्ती आहे. हा स्टंट करतानाच त्याला ब्रेन इंज्युरी झाली होती. त्यानंतर त्याला आठ महिन्यांच्या विश्रांतीचा सल्ला देण्यात आला होते. मात्र हृतिकने दोन महिन्यांतच व्यायाम सुरु केला आणि लवकरच तो शूटिंगवर परतला.
हृतिकने सांगितले, "मी फ्लायबॉयचे ट्रेनिंग घेतले, कारण हा स्टंट मी स्वतः करु इच्छित होतो. मात्र याकाळात माझ्या आयुष्यात एक अघटीत घटना घडली. माझ्या मते, इच्छा शक्ति असल्यास मनुष्य काहीही करु शकतो. ब्रेन सर्जरी झाल्यानंतर मी पुन्हा माझ्या रुटीन आयुष्यात परतलो आणि उर्वरित सर्व स्टंट्स स्वतः केले."
मंगळवारी या सिनेमाचा 58 सेकंदांचा टीझर रिलीज करण्यात आला. यामध्ये हृतिकने घेतलेली मेहनत आणि जबरदस्त अॅक्शन बघायला मिळत आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा हृतिकच्या जबरदस्त अॅक्शन सीन्सची खास झलक...