(फोटो: जॉन अब्राहम आणि अजय देवगण)
मुंबई- अंडरवर्ल्डवर आतापर्यंत ढीगभर सिनेमे आले आहेत. पण त्यात अनेक असे सिनेमे होते ज्यात अभिनेत्यांनी खऱ्याखुऱ्या डॉन्सच्या भूमिका साकारल्या. पोलिसांच्या रेकॉर्डमध्ये दहशतीचं दूसरं नाव असलेले
दाऊद इब्राहिम, टायगर मेनन, मन्या सुर्वे, हाजी मस्तान आणि छोटा राजन यांसारखे अंडरवर्ल्ड डॉन सिनेमांत अवतरले, तेव्हा लोकांच्या टाळ्या पडल्या. खरंतर ही भूमिका बजावण्याऱ्या कलाकारांनी आपल्या उपस्थितीने या डॉन्सच्या आयुष्याची फक्त एक झलकच दाखवली होती, परंतू प्रेक्षक मात्र या सिनेमांवर फिदा झाले.
90 च्या दशकात मोठ्या पडद्यावर ज्या कथा जन्माला आल्या ज्याची पार्श्वभूमी अंडरवर्ल्ड डॉन किंवा त्यांनी केलेले हल्ले हा आधार होता. कधीकाळी खऱ्या जगात असणाऱ्या यांच्या दहशतीची झलक पडद्यावर दाखवण्यात आली होती.
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम असो किंवा या काळ्या जगातील दूसरे गँगस्टर्स छोटा राजन, माया डोळस, मन्या सुर्वे या सगळ्याच मोठ्या नावांच्या कहाण्या सिल्व्हर स्क्रीनवर पाहणं लोक पसंत करतात. पण त्यात हे खरं आहे, की दाऊद इब्राहिमच्या पात्राएवढी प्रसिद्धी क्वचितच दुसऱ्या एखाद्या पात्राला मिळाली असेल. गुन्हेगारी जगतातील या राजांनी अनेकदा आपला जलवा सिल्व्हर स्क्रीनवर दाखवला आहे. मागच्या काही वर्षापासून दिग्दर्शकांनी दाऊदसोबतच्या इतर अनेक लोकांनादेखील आपल्या कथेत सामील करुन घेतले होते.
या रिपोर्टमध्ये आम्ही अशाच 6 डॉन्सच्या दहा कथा सांगणार आहोत. पुढील स्लाइड्सवर वाचा मन्या सुर्वे, माया डोळस, दाऊद, हाजी मस्तान आणि छोटा राजन यांना आधार बनवून गुंफलेल्या भूमिका ज्यावर सिनेसृष्टीतील नायकांनी आपला जीव ओतून काम केले...