आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • This Dream Of Actor Sadashiv Amrapurkar Not Fulfill

अपूर्ण राहिली अमरापूरकर यांची ही दोन स्वप्ने, जाणून घ्या त्यांच्या या स्वप्नांविषयी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- कॉलेजच्या दिवसात आपल्या मित्रांसोबत सदाशिव आमरापूरकर)
पुणे- प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे हिंदी आणि मराठी अभिनेते सदाशिव आमरापूरकर आज अनंतात विलीन झाले आहेत. अहमदमनगर येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आला. सदाशिव यांचे बालपणसुध्दा अहमदनगर येथे गेले. येथूनच त्यांनी आपले शिक्षणदेखील पूर्ण केले आणि येथूनच त्यांच्या करिअरला सुरुवात झाली. सदाशिव अमरापूरकर यांना याच शहरात राहण्याची इच्छा होती. परंतु त्यांचे हे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. आजसुध्दा त्यांच्या अनेक आठवणी या शहाराशी जोडलेल्या आहेत.
आपल्याला जन्मगावी राहण्याचे स्वप्न होते
अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील अमरापूरकर हे गाव सदाशिव अमरापूकर यांचे मुळे गाव होते. मात्र या गावाला अमरापूरकर यांनी वयाच्या पाचव्या वर्षी सोडले. तरीदेखील त्यांच्या बालपणीच्या आठवणी या गावाशी जोडलेल्या आहेत. सदाशिव यांनी आपले शालेय शिक्षण अहमदनगरच्या नगर निगम शाळेतून पूर्ण केले आणि पुढील शिक्षणासाठी नगरच्या महाविद्यालयात प्रवेश घेतला. निवृत्त झाल्यानंतर सदाशिव यांना त्यांच्या मुळ गावी राहण्याची इच्छा होती. परंतु प्रकृतीने त्यांना साथ दिली नाही. त्यांचे हे स्वप्न अपूर्ण राहिले.
गावात एक म्यूजिअम चालू करायचे होते
सदाशिव यांना आपल्या गावात फिल्म म्यूजिअम चालू करण्याचेसुध्दा स्वप्न होते. त्यासाठी त्यांनी पैसे जमवले होते. या म्यूजिअमसाठी पैसे जमवण्यासाठी अमरापूरकर यांनी अनेक शो केले. परंतु त्यांचे हे स्वप्नसुध्दा अपूर्ण राहिले.
नेहमी गावी यायचे अमरापूरकर
सिनेमांच्या शूटिंगमधून वेळ मिळाली की सदाशिव नेहमी अहमदनगरला जात असे. गावक-यांचे म्हणणे आहे, की अमरापूरकर हे मनमिळावू व्यक्ती होते. छोट्यांपांसून मोठ्यांपर्यंत सर्वांचा आदर करत होते. त्यांच्या या स्वभावानेच लोकांनी त्यांना खूप जवळ केले.
शिक्षकाच्या म्हणण्याने केली अभिनयाला सुरुवात
कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना शिक्षक मधूर तोरडमल यांनी त्यांना एक मंचावर पाहिले आणि अमरापूरकर यांना फिल्मी करिअरसाठी प्रोत्साहित केले. त्यानंतर सदाशिव यांनी मराठी नाटक मंडळीशी जोडले आणि मराठी नाट्य अंदोलनाचे नेतृत्वसुध्दा केले.
चांगले क्रिकेटरसुध्दा होते
अभिनयाव्यतिरिक्त सदाशिव क्रिकेटसुध्दा खेळण्याचे शौकीन होते. कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना ते क्रिकेट खेळायचे. करिअरसाठी त्यांना अभिनय किंवा क्रिकेटमधून एकाची निवड करायची होती. सदाशिव यांनी आपल्या मनाचे ऐकले आणि घरच्यांच्या विरोधात जाऊन त्यांनी सिनेमाकडे आपले मोर्चा वळवला.
गांधीवादी होते सदाशिव
सदाशिव अमरापूरकर एक यशस्वी अभिनेते होतेच, सोबतच ते गांधीवादी आणि समाजसेवकसुध्दा होते. त्यांनी आण्णा हजारे यांच्या जनलोकपाल अंदोलनाचे समर्थन केले होते. अमरापूरकर गांधीवादी होते. त्यांनी त्या अंतर्गत अनेक अंदोलने केले होते. होळी सणाच्या वेळेस त्यांनी पाण्याच्या नासाडीच्या विरोध झालेल्या अंदोलनाचे त्यांनी नेतृत्व केले होते. त्यावेळी त्यांना लोकांच्या रागाचा सामना करावा लागला होता.
अनेक अंदोलनांचे नेतृत्व केले
सिनेमांव्यतिरिक्त सदाशिव यांनी शेतक-यांचे हित, गावातील दारिद्र दूर करणे, शिक्षणाविषयी जनजागृती, युवकांचे हित, अंधश्रध्दा निर्मूलनासारख्या विषयांवर त्यांनी अनेक कामे केली. ते नेहमी टीव्हीवर भ्रष्टाचाराच्या विरोधात कडक कायदा करण्याच्या मुद्यावर बोलताना दिसत होते. महाराष्ट्रातील जेष्ठ समाजसेवक आण्णा हजारे, मेधा पाटकर, डॉ. नरेंद्र दाभोळकर, डॉ. अनिल अवचट यांच्या संपर्कात आल्यानंतर ते समाजिक कार्याशी जोडल्या गेले.
'अर्धसत्य' तसेच 'सडक'सारख्या सिनेमांमध्ये दमदार अभिनय करणारे 64 वर्षीय अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांचे सोमवारी (3 नोव्हेंबर) मुंबईच्या कोकिलाबेन रुग्णालयात निधन झाले. त्यांना फुफ्फुसात संसर्ग झाला होता. त्यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक खलनायकाच्या आणि विनोदी भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सदाशिव अमरापूरकर यांची मुळ गावातील काही दुर्मिळ छायाचित्रे...