(श्रुती हासन)
मंगळवारी मुंबईत अनेक सेलिब्रिटी एकत्र आले होते. निमित्त होते आर. बाल्की दिग्दर्शित 'शमिताभ' या आगामी सिनेमाच्या म्युझिक लाँचचे. आर. बाल्की दिग्दर्शित या सिनेमात
अमिताभ बच्चन, धनुष आणि अक्षरा हासन यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
या सिनेमाद्वारे कमल हासन यांची धाकटी मुलगी आणि बॉलिवूड अभिनेत्री श्रुती हासन हिची बहीण बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या सिनेमाच्या म्युझिक लाँच इव्हेंटमध्ये श्रुतीने अक्षरासोबत हजेरी लावली होती. या दोघींचे आईवडील अर्थातच कमल हासन आणि सारिकासुद्धा यावेळी उपस्थित होते. श्रुतीचा यावेळी ग्लॅमरस अंदाज उपस्थितांना पाहायला मिळाला. श्रुतीने अर्पिता मेहताने डिझाइन केलेला लहेंगा परिधान केला होता. तर अक्षरा हासनने ब्लॅक कलरचा गाऊन परिधान केला होता.
या इव्हेंटमध्ये
ऐश्वर्या राय बच्चन, श्रीदेवी, श्रेया घोषाल, तब्बू यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. अभिनेत्रींचा देसी अंदाज येथे बघायला मिळाला. ब्युटी क्वीन ऐश्वर्या राय बच्चन पती
अभिषेक बच्चनसोबत दिसली. तिने गडद पिवळ्या रंगाचा अनारकली ड्रेस परिधान केला होता. अबू संदीप यांनी डिझाइन केलेल्या या ड्रेसमध्ये ऐश्वर्या खूप सुंदर दिसली.
अभिनेत्री श्रीदेवी क्रिम कलरच्या सुंदर साडीत या इव्हेंटमध्ये अवतरली होती. सब्यसाचीच्या या साडीत श्रीदेवीचे सौंदर्य अधिक खुलून दिसले. तर अभिनेत्री तब्बूने रोहित गांधी आणि राहुल खन्ना यांच्या कलेक्शनमधील चुडीदार ड्रेस परिधान केला होता. गुलाबी रंगाच्या या ड्रेसवर तिने सिल्व्हर कलरची ओढणी घेतली होती.
या म्युझिक लाँचमधील सेलिब्रिटींचा खास अंदाज बघण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...