आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • This Is How Sonam Kapoor Has Changed Over The Years

जाणून घ्या 7 वर्षांमध्ये किती बदलली 'सांवरिया'ची सोनम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
2007मध्ये आलेल्या 'सांवरिया या सिनेमामधून सोनम कपूरने आपल्या फिल्मी करिअरला सुरूवात केली होती. सिनेमा निर्माता संजय लीला भन्साळी यांच्या या सिनेमात रणबीर कपूर आणि सोनम यांना मुख्य भूमिकेसाठी कास्ट करण्यात आले होते. त्यावेळी ती निळ्या रंगाचा ड्रेस परिधान करून मुलाखतींमध्ये प्रेक्षकांना आपला सिनेमा बघण्यासाठी सांगत होती. सुंदर दिसणारी सोनम त्यावेळी बॉलिवूडच्या वास्तविकतेशी अज्ञान होती. तिचा सिनेमा बघण्यासाठी प्रेक्षकांना कोणतेच खास कारण नव्हते.
परंतु सोनमने आपल्या सौंदर्याने प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले. 'सांवरिया' रिलीज होऊन आज 7 वर्षे पूर्ण झाली आहेत. गेल्या 7 वर्षांमध्ये सोनमने स्वत:ला पूर्णत: बदलून टाकले आहे. अर्थातच सोनम 'सांवरिया'मध्ये खूपच नाजूक आणि शांत तरुणीप्रमाणे दिसली. तिच्या अभिनयामध्येसुध्दा कमीपणा जाणवत होता. परंतु सोनम आता एक दमदार आणि बिनधास्त अभिनेत्रींमध्ये गणली जाते.
अलीकडचे 'कॉफी विथ करण'च्या एपिसोडमध्ये सोनम पोहोचल्यानंतर तिच्या लूकच्या ब-याच चर्चा झाल्या. सोनम आपल्या ड्रेस सेन्समुळे लोकप्रिय आहे. तिला जेव्हा कोणत्या कार्यक्रमात बघितल्यानंतर तिच्या ड्रेसची प्रशंसा होतीच होती. करणच्या शोमध्ये तिच्यासोबत दीपिका पदुकोणसुध्दा दिसली. परंतु लूकच्या बाबतीत ती दीपिकापेक्षा आकर्षक दिसली.
सोनम कपूरच्या बदलत्या लूकविषयी आणि तिच्या संबंधीत काही गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइट्सवर क्लिक करा...