आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • This Luxurious Paradise To Live In Owner Shah Rukh 3,000 Crore

PIX:शाहरुखच्या दुबईतील 'दि सिग्नेचर व्हिला'ची झलक तुम्ही पाहिली आहे का?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडमध्ये जेवढे सुपरस्टार्स आहेत, त्या सगळ्यांच्या स्वतःच्या खास आवडीनिवडी आहेत. कुणाला महागड्या गाड्यांची आवड आहे तर कुणाला आलिशान बंगल्यांची.
जवळजवळ तीन हजार कोटींचा मालक असलेल्या शाहरुख खानच्या आलिशान 'मन्नत'विषयी तर सगळ्यांनाच ठाऊक आहे. मुंबईतील शाहरुखच्या 'मन्नत' या बंगल्याची किंमत दीडशे ते दोनशे कोटींच्या घरात आहे. 'मन्नत'शिवाय शाहरुखकडे आणखी एक बंगला आहे. मात्र या बंगल्याविषयी फार जणांना ठाऊक नाहीये.
शाहरुखने आपला दुसरा आलिशान बंगला दुबईत बनवला आहे. शाहरुखचा हा लक्झरी हॉलिडे होम एखाद्या महालापेक्षा कमी नाहीये. या बंगल्यात प्रत्येक छोट्या-मोठ्या सुविधांकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. 2008-09 साली रिअल स्टेट प्रोजेक्टच्या प्रमोशननंतर दुबईतील एका कंपनीने शाहरुखला हे घर भेट म्हणून दिले.
शाहरुखचे हे घर 14000 स्वेअर फुट असून त्यावर साडे आठ हजार स्वेअर फूटचे बांधकाम करण्यात आले आहे. दुबईतील पाम जुमेराह (Palm Jumeirah) या पिरसरात शाहरुखचा हा बंगला आहे. शाहरुखने आपल्या या बंगल्याचे नाव 'दि सिग्नेचर व्हिला' असे ठेवले आहे. या बंगल्यात प्रत्येक छोट्या-मोठ्या सुविधांकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. या व्हिलामध्ये सहा बेडरुम आहेत. शिवाय जिम, लिफ्ट आणि प्ले ग्राऊंडचीही सोय या व्हिलात आहे. शाहरुखने खास दोन रिमोट कंट्रोल्ड कार गॅरेज तयार करुन घेतले आहेत. सुटीच्या दिवसांत शाहरुख आपल्या कुटुंबीयांबरोबर नेहमी येथे येत असतो.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा शाहरुखच्या या बंगल्याची खास झलक...