आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • This Year Mikta Festivel Orgnisied In Switzerland

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'मिक्ता\' नाटक आणि चित्रपट महोत्सव यंदा प्रथमच पुण्यात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - म्हैसकर फाउंडेशन आणि महाराष्ट्र कलानिधी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘मिक्ता’ महोत्सव यंदा स्वित्झर्लंड येथे होणार असून दरवर्षीप्रमाणे मुख्य सोहळ्याआधी होणारा नाट्य आणि चित्रपट महोत्सव यंदा प्रथमच पुण्यात होत असल्याची माहिती मिक्तातर्फे देण्यात आली.

मराठी चित्रपट आणि नाटकाला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेऊन ठेवणे हे म्हैसकर मिक्ता सोहळ्याचे वैशिष्ट्य आहे. दुबई, लंडन, सिंगापूर आणि आता स्वित्झर्लंड अशा ठिकाणी मराठी नाटक आणि चित्रपट पोहोचवण्याचे र्शेय महेश मांजरेकर यांच्या मिक्ताला जाते. दरवर्षी परदेशी होणार्‍या मिक्ताच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी मराठी चित्रपट आणि नाटकांची निवड केली जाते. वर्षभरातील उत्तमोत्तम मराठी चित्रपट आणि नाटके यात सहभाग घेतात. याआधी मुंबई, ठाणे येथे मिक्ताच्या वतीने चित्रपट व नाटक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यंदा ही स्पर्धा पुण्यात होणार असल्याने 10 नाटके व 10 चित्रपटांची निवड प्राथमिक फेरीसाठी करण्यात आली आहे.


पुण्यातील कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात मिक्ता नाट्य महोत्सव रंगणार असून चित्रपट महोत्सवाचे आयोजन सिटी प्राइड कोथरूड येथे करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे. तरी पुणेकरांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहून या महोत्सवाचा आनंद घ्यावा आणि उत्तम कलाकृती निवडण्यात सहभाग घ्यावा, असे आवाहन मिक्ता टीमच्या वतीने करण्यात आले आहे.

पुण्यात होणा-या 'मिक्ता' 2013 नाट्य महोत्सवासाठी निवडण्यात आलेल्या 10 नाटकांची नावं...

प्रपोजल
गेट वेल सून
ठष्ट
डू अँड मी
एकदा पाहावं न..
फॅमिली ड्रामा
सुखान्त
ड्राय डे
उणे पुरे शहर एक
ती गेली तेव्हा

पुण्यात होणा-या 'मिक्ता' 2013 नाट्य महोत्सवासाठी निवडण्यात आलेल्या 10 सिनेमांची नावं...

दुनियादारी
टाइम प्लीज
आजचा दिवस माझा
72 मैल एक प्रवास
बालक पालक
प्रेमाची गोष्ट
इन्व्हेस्टमेंट
अनुमती
आयना का बायना
धग