आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जावेद अख्तर यांना धमकीचे फोन कॉल्स, 'काम पूर्ण केले नाही तर बघून घेईल'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो: जावेद अख्तर
मुंबई. संगीतकार जावेद अख्तर यांनी एका अज्ञात व्यक्तीच्या विरोधात जुहू पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. तो व्यक्ती अख्तर यांना मागील एक वर्षापासून धमकी देत आहे. त्यांना आलेले सर्व फोन कॉल्स बिहारमधून करण्यात आले असल्याची माहिती आहे. जुहू पोलिसांच्या सांगण्याप्रमाणे, गुरूवारी (3 जुलै) जावेद अख्तर यांचा मॅनेजर तक्रार पत्र घेऊन आला. मॅनेजरने सांगितले, की एक अज्ञात व्यक्ती त्यांना अवेळी फोन करून त्रास देत आहे.
एकदा त्या अज्ञात व्यक्तीने त्यांना विचारले, की मी दिलेले काम पूर्ण झाले की नाही? नरेंद्र मोदी यांच्याशी भेट झाली काही नाही? काहीच माहिती न देता फोन करणा-या व्यक्तीने सांगितले, की जर माझे काम पूर्ण झाले नाही तर बघून घेईल. अनेकदा त्या व्यक्तीने जावेद अख्तर यांना शिवीगाळसुध्दा केली.
फोन करणारा व्यक्ती असाही म्हणाला, सुचना दिली आहे तर त्याचे पालन व्हायलाच हवे. जावेद यांच्या तक्रारीवर कारवाई करून जुहू पोलिसांनी आलेल्या चारही नंबरची तपासणी केली. त्यातील दोन नंबर स्विच ऑफ आहेत आणि बाकिचे दोन नंबर निर्दोष व्यक्तींचे आहेत.
जुहू पोलिस स्टेशनमधील एका अधिका-याने सांगितले, की फोन करणारा खूप चालाख आहे. त्याने स्वत:च्या फोनवरून कॉल केले नाहीत. त्याने ट्रेनमध्ये प्रवास करणा-या लोकांच्या फोनवरून कॉल केले आहेत. त्याने लोकांना सांगितले, की त्याचा फोन हरवला आहे आणि त्याला एक अत्यावश्यक कॉल करायचा आहे. जावेद यांना आलेले चारही नंबर बिहारचे आहेत.