आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Three Months Holidays Were Over, Sanjay Prison Today

PICS: संजय परतला तुरुंगात, मान्यताला अश्रु झाले अनावर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अभिनेता संजय दत्तच्या वाढीव पॅरोलची मुदत संपल्याने तो शनिवारी येरवडा तुरुंगात परतला. पॅरोल वाढवल्याच्या मुद्द्यावरून त्याच्यासह राज्य सरकारवरही मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती. संजय दत्त 21 डिसेंबर रोजी पॅरोलवर सुटला होता. त्यानंतर त्याला दोन वेळा सरकारकडून पॅरोलमध्ये वाढ मिळाली.
पत्नीच्या आजारपणाच्या कारणामुळे त्याला ही सुटी मंजूर करण्यात आली होती. अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी संजय दत्त सध्या शिक्षा भोगत आहे. याआधी संजूबाबाला 15 दिवसांची फर्लो रजाही मिळाली होती. त्या वेळीही त्याने वैद्यकीय कारणांमुळे त्यात वाढ करून घेतली होती. यादरम्यान संजयने ख्रिसमस, नवीन वर्ष, महाशिवरात्री आणि होळी हे सण आपल्या कुटुंबीयांसोबत साजरे केले.
संजय दत्तला 1993च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यापैकी 42 महिन्यांची शिक्षा संजयने पूर्ण केली आहे. उर्वरीत साडे तीन वर्षांची शिक्षा त्याला भोगायची आहे.
संजयला आत्तापर्यंत किती वेळा मंजुर झाली सुटी
आत्तापर्यंत 170 दिवस तुरुंगात - 16 मे 2013 पासून ते जानेवारी 2014पर्यंत संजयला जवळजवळ 240 दिवस तुरुंगात घालवायचे होते. मात्र याकाळात तो 170 दिवसच तुरुंगात राहिला.
सप्टेंबर महिना - संजय दत्तने आपल्या पायांच्या उपचारासाठी सप्टेंबर 2013मध्ये दहा दिवसांसाठी फर्लोचा अर्ज केला होता. मात्र याकाळात तो उपचारासाठी अनेक दिवस तुरुंगाबाहेर राहिला.
ऑक्टोबर महिना - 1 ऑक्टोबर 2013पासून तो उपचारांसाठी दोन आठवडे तुरुंगाबाहेर होता. 14 ऑक्टोबरला आणखी दोन आठवड्यांची मुदतवाढ त्याला देण्यात आली होती. अर्थातच तो एक महिना तुरुंगाबाहेर होता.
डिसेंबर - डिसेंबर 2013मध्ये संजयने पत्नी मान्यताच्या आजारपणामुळे एक महिन्यासाठी पॅरोलचा अर्ज केला होता. 21 डिसेंबरपर्यंत त्याला सुटी मंजूर झाली होती. त्यानंतर त्याने पुन्हा पॅरोलचा अर्ज केला. 21 जानेवारीपर्यंत त्याला मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतर त्याची पॅरोलची मुदत 21 फेब्रुवारी आणि पुढे 21मार्चपर्यंत वाढवण्यात आली होती.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा तुरुंगात जाण्यासाठी घरुन निघतानाची संजयची छायाचित्रे...