आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येथे 19 वर्षांपासून सुरु आहे \'DDLJ\', तिकिटाची किंमत 15, 17, 20, वाचा स्टोरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(मराठा मंदिर या थिएटरच्या तिकिट खिडकीवर लागलेली रेट लिस्ट)
मुंबईः शाहरुख खान आणि काजोल स्टारर 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' या सिनेमाला मुंबईतील मराठा मंदिरमध्ये प्रदर्शित होऊन 1000 आठवडे पूर्ण झाले आहेत. आदित्य चोप्रा दिग्दर्शित हा सिनेमा 1995 मध्ये रिलीज झाला होता. तेव्हापासून हा सिनेमा मराठा मंदिरमध्ये सुरु आहे.
'डीडीएलजे' या सिनेमाने सर्वाधिक चालणा-या हिंदी सिनमाचा रेकॉर्ड आपल्या नावी केला आहे. विशेष म्हणजे गेल्या दहा वर्षांपासून या सिनेमाच्या तिकिटाची किंमत 20 रुपयांच्या वर गेलेली नाही. दहा वर्षांपूर्वी या सिनेमाच्या तिकिटाची सर्वाधिक किंमत ही 20 रुपये होती, जी आजही कायम आहे.
जेव्हा 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' या सिनेमाने दहा वर्षे पूर्ण केली होती, तेव्हा तिकिटांची किंमत 16, 18 आणि 20 रुपये होती आणि आज तिकिटांची किंमत 15, 17 आणि 20 रुपये इतकी आहे. असे आम्ही नाही, तर मराठा मंदिराच्या तिकिट खिडकीवर रेट लिस्ट सांगत आहे.
पुढील स्लाईड्समध्ये तुम्ही बघू शकता, गेल्या काही वर्षांपासून लागलेली मराठा मंदिराच्या तिकिट खिडकीवरील रेट लिस्ट...
नोटः मराठा मंदिर येथे दररोज सकाळी 11.30 वाजता दिलवाले दुल्हनिया ले जाएंगेचा शो असतो. बातम्यांनुसार आजही 60 टक्के सीट्स फूल असतात.