आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tiger Shroff & Kriti Sanon At 'Heropanti' Music Launch

जॅकी श्रॉफचा मुलगा टायगरच्या 'हीरोपंती'चे म्युझिक लाँच, पाहा PIX

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता जॅकी श्रॉफचा मुलगा टायगर श्रॉफ 'हीरोपंती' या सिनेमाद्वारे रुपेरी पडद्यावर पदार्पण करत आहे. अलीकडेच मुंबईत या सिनेमाचे म्युझिक लाँच करण्यात आले. टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री किर्ती सेनन यांनी आपल्या या सिनेमाचे म्युझिक लाँच केले.
'हीरोपंती'मधील ओपनिंग गाणे व्हिसल बजा (सीटी बजा) आहे. हे गाणे बासरी वादकांना समर्पित करण्यात आले आहे. म्युझिक लाँचवेळी सिनेमाचे निर्माते साजिद नाडियाडवाला यांनी 10 बासरी वादकांना आमंत्रित केले होते. यावेळी त्यांना सन्मानित करण्यात आले.
म्युझिक लाँच सोहळ्यात टायगर खूप कूल दिसत होता. तर किर्तीसुद्धा सुंदर दिसली.
'हीरोपंती' हा एक अॅक्शन सिनेमा आहे. यात टायगरने यूपी तरुणीची भूमिका साकारली आहे. या भूमिकेसाठी त्याने मार्शल आर्ट्सचे प्रशिक्षण घेतले. शब्बीर खान यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. तर साजिद-वाजिद या सिनेमाचे संगीतकार आहेत. येत्या 23 मे रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा 'हीरोपंती'च्या म्युझिक लाँच सोहळ्याची खास छायाचित्रे...