आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tiger Shroff Replace To Hrithik Roshan In Shuddhi?

शुद्धी’मध्ये हृतिकच्या जागी टायगर श्रॉफ?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिनेमातील प्रमुख भूमिकेसाठी अभिनेता रणवीर सिंहने भन्साळीच्या ‘बाजीराव मस्तानी’साठी ‘शुद्धी’ सिनेमावर पाणी सोडले आहे. हृतिक रोशनने जेव्हा ‘शुद्धी’ सिनेमा सोडला तेव्हापासून निर्माता करण जोहर आणि दिग्दर्शक करण मल्होत्रांच्या नजरा बॉलीवूडमधील गल्लीबोळात फिरत आहेत. मात्र, अजून तरी सिनेमासाठी योग्य चेहरा हाती लागला नाही. पर्याय म्हणून शाहरुख खान, आमिर खान आणि रणवीर सिंह यांची नावे समोर आली खरी मात्र, कोणत्या ना कोणत्या कारणाने या तिघांनीही सिनेमा करण्यास नकार दिला.
आता ताजी बातमी अशी आहे की, ‘हीरोपंती’ सिनेमातून बॉलीवूडमध्ये पर्दापण केलेला टायगर श्रॉफ ‘शुद्धी’मध्ये प्रमुख भूमिका साकारणार आहे. अमीश त्रिपाठीच्या ‘द इमॉर्टल्स ऑफ मेलुहा’ या कादंबरीवर हा सिनेमा आधारित असल्याचे सांगण्यात येत आहे. सिनेमातील मुख्य पात्र भगवान शिवची काल्पनिक आवृत्ती आहे. या शिवजींच्या पात्रासाठी नायक शरीराने तंदुरुस्त अणि अ‍ॅक्शन दृश्यासाठी सक्षम असायला हवा. त्यामुळे सध्याच्या बॉलीवूडमधील नायकांच्या भाऊगर्दीत टायगरशिवाय दुसरा चेहरा उपलब्ध नाही.
करण जोहरने ‘हीरोपंती’चा ट्रेलर पाहिला असून टायगरमध्ये चांगल्या लूकसोबतच अ‍ॅक्टिंगची योग्यता असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. एकूणच ‘शुद्धी’मध्ये हृतिकच्या जागी टायगरची वर्णी लागण्याची शक्यता मानली जात आहे. मात्र, या वृत्ताला अजून अधिकृतरीत्या दुजोरा मिळाला नाही.