आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: टायगरने आमिर-सलमानला दिली पार्टी, हृतिकसाठी ठेवले स्पेशल स्क्रिनिंग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'हीरोपंती'मधून आपल्या फिल्मी करिअरला सुरूवात करणारा टायगर श्रॉफ त्याच्या यशाने खूप आनंदी आहे. त्यामुळे तो आपला आनंद बॉलिवूडच्या दिग्गज सेलेब्ससह साजरा करत आहे. अलीकडेच, टायगरने मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आणि बॉलिवूडचा दबंग खान अर्थातच सलमान खान यांच्यासाठी एका पार्टीचे आयोजन केले होते.
'हीरोपंती'च्या स्पेशल स्क्रिनिंगला बॉलिवूडचे अनेक स्टार्स पोहोचले होते. जॅकी श्रॉफ यांनी मुलगा टायगरच्या पहिल्या सिनेमाच्या स्क्रिनिंगमध्ये स्वत: पोहोचून सर्व स्टार्सचे स्वागत केले होते. बॉक्स ऑफिसवर टायगरच्या सिनेमाला यश मिळाल्यामुळे तो सध्या बॉलिवूडच्या दिग्गज स्टार्ससह पार्टी एन्जॉय करत आहे. या सिनेमाने आतापर्यंत 32.5 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. सिनेमाच्या व्यवसायाविषयी माहिती देताना व्यवसाय पंडित तरण आदर्श यांनी टि्वटरवर याच्या कमाईचे आकडे टि्वट केले आहेत.
पहिल्या तीन दिवसांमध्ये 'हीरोपंती'ची कमाई

शुक्रवार- 6.33 कोटी
शनिवार- 6.42 कोटी
रविवार- 8.28 कोटी
कुल- 21.33 कोटी

टायगरच्या सिनेमाने पहिल्या तीन दिवसांमध्ये 21 कोटींचा व्यवसाय केला आहे. त्यावरून टायगरची बॉलिवूडमध्ये दमदार एंट्री झाल्याचे जाणवते. सिनेमाच्या सक्सेस पार्टीवेळी टायगरने हृतिक रोशनसाठी एका स्पेशल स्क्रिनिंगचे आयोजन केले.
एका सुत्राने दिलेल्या माहिनुसार, 'टायगरने हृतिक रोशनसाठी हिरोपंतीची स्पेशल स्क्रिनिंग यशराज फिल्म्स स्टुडिओमध्ये मंगळवारी (27 मे) रात्री आयोजित केली होती. टायगरच्या अभिनयाची हृतिकने स्तुती केली आणि त्याला काही टीप्सही दिल्या.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून बघा टायगरने बॉलिवूडच्या सुपरस्टारसह कसे सिनेमाचे यश साजरे केले...