(बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ)
\'हीरोपंती\' सिनेमामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा अभिनेता टायगर श्रॉफ, टीचर्स डे निमित्त त्याच्या डान्स गुरुला गिफ्ट देणार आहे. तो एका व्हिडिओमध्ये डान्स गुरुसोबत डान्स करताना दिसणार आहे.
टायगर श्रॉफने अनेक निमित्तांवर इंटरनॅशनल सिंगर आणि डान्सर मायकल जॅक्सनचा दीवाना असल्याचे दाखवून दिले आहे. टीचर्स डे निमित्त Divyamarathi.comने त्याच्याशी बातचीत केल्यानंतर त्याने सांगितले, \'माझे आवडते डान्स टीचर परेश शिरोडकर आहेत. त्यांनी मला माझ्या आयुष्यात सर्वात मोठे गिफ्ट दिले आहे. ते मी माझ्या डान्सव्दारे प्रदर्शित करत आहे. टीचर्स डे निमित्त मी माझा मायकल जॅक्सनचा व्हिडिओ रिलीज करत आहे. त्यामध्ये परेश सरसुध्दा माझ्यासोबत दिसणार आहेत.\'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा एमजे स्टाइलमध्ये टायगर श्रॉफची काही छायाचित्रे...