आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tiger Shroff With Kirti Senon At Babulnath Tample

PICS: 'हीरोपंती'च्या अभिनेत्रीसह बाबुलनाथ मंदिरात पोहोचला टायगर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जॅकी श्रॉफ यांचा मुलगा टायगरने बॉलिवूडमध्ये धमाकेदार एंट्री केली आहे. त्याचा 'हीरोपंती' हा पहिलाच सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस पडला आहे. या सिनेमाने तीन दिवसांमध्ये 20 कोटींचा व्यावसाय केला आहे.
सिनेमाची दमदार सुरूवात बघून काल सिनेमाचे स्टार्स (26 मे) मुंबईमधील बाबुलनाथ मंदिरात पोहोचले होते. यावेळी त्याच्यासोबत सिनेमाची मुख्य अभिनेत्री किर्ती सेननसुध्दा होती. दोघांनी मंदिरात महादेवाचे दर्शन घेतले आणि पूजासुध्दा केली. हे मंदिर मुंबईमधील सर्वात पौराणिक मंदिर म्हणून ओळखले जाते. इथे बॉलिवूड सेलिब्रिटींचे येणे-जाणे सतत चालूच असते.
सिनेमाचे यश लक्षात घेता रविवारी रात्री मुंबईमध्ये एक शानदार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये आमिर खान, सलमान खानसह अनेक स्टार्सनी हजेरी लावली होती. सब्बीर खान दिग्दर्शित हा सिनेमा साजिद नाडियाडवालाने निर्मिती केला आहे. सिनेमाचे यश टायगरचा अभिनय आणि जबरदस्त स्टंटसह जोडल्या जात आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा मंदिरातमध्ये आलेल्या किर्ती सेनन आणि टायगर श्रॉफची छायाचित्रे...