आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशी बनली टायगर श्रॉफची बॉडी, रोज खातो मासे-चिकन, उचलतो 190 किलो वजन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉक्स ऑफिसवर आज टायगर श्रॉफची परिक्षा होणार आहे. त्याचा 'हीरोपंती' हा पदार्पणाचा सिनेमा आज (23 मे) रिलीज होत आहे. सिनेमा हिट होण्यासाठी त्याने प्रमोशनदरम्यान बरीच मेहनत घेतली आहे. प्रमोशनवेळी त्याने कधी डान्स करून लोकांचे मन जिंकले तर कधी लाइव्ह स्टंट करून लोकांना अचंबित केले.
'हीरोपंती'चा दिग्दर्शक सबिर खान असून साजिद नाडियाडवाला निर्मिती करत आहे. सिनेमाला साजिद-वाजिदने संगीत दिले आहे. हे सिनेमा टायगर श्रॉफसह किर्ती सेननचासुध्दा बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याचा सिनेमा आहे. सिनेमात टायगर किती हीरोपंती दाखवणार याचा निर्णय प्रेक्षकच घेतील. परंतु तो बॉडी आणि डान्सचा हीरो आहे, ही गोष्ट त्याने सिध्द केली आहे. टायगर खूप सहजरित्या स्टंट करू शकतो. परंतु बघणा-यांसाठी हे एक आश्चर्यचकित करणारे कृत्य आहे.
जॅकी श्रॉफ यांचा मुलगा टायगर बॉलिवूडमध्ये कम्पलीट पॅकेजसह बॉलिवूडमध्ये एंट्री करत आहे. अर्थातच चंचल असल्यासोबतच डान्स आणि बॉडीमध्येसुध्दा त्याला काहीच अडचण नाहीये. परंतु आपल्या बॉडीला फिट लूक देण्यासाठी त्याने वर्षानुवर्षे खूप मेहनत घेतली आहे. त्याने जिममध्ये जाऊन घाम तर गाळलाच परंतु त्यासह डायटसुध्दा केले. तो सर्व कामे पूर्ण वेळापत्रकानुसार करतो. जेवणात तो 8 अंडे किंवा चिकन आणि मासे खातो. जिममध्ये 190 किलोपर्यंत वजन उचलतो.
टायगर श्रॉफचे डायट
ब्रेकफास्टः 8 अंडे (ब्रेड आणि ऑम्लेटसोबत )
स्नॅक्सः ड्राय फ्रुट्स
लंचः ब्राउन राइस चिकन आणि फिशसोबत, उकडलेल्या भाज्या
स्नॅक्सः जिमनंतर प्रोटीन शेक
डिनरः फिश किंवा फळ
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या सोमवारीपासून ते रविवारपर्यंत टायगरच्या व्यायमाचे वेळापत्रक...