आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'होरीपंती\'द्वारे आणखी एका स्टारपुत्राची एन्ट्री

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

या आठवड्यात जॅकी श्रॉफ यांचा मुलगा टायगर श्रॉफचा 'हीरोपंती', रजनीकांत यांचा 'कोच्चाडियान' आणि एक्स मॅन सीरिजचा 'डेज ऑफ फ्यूचर पास्ट' हा हॉलिवूड सिनेमा बॉक्स ऑफिसवर दाखल झाला.
निर्माता साजिद नाडियाडवाला यांनी 'हीरोपंती' हा सिनेमा डिस्ने/युटीव्हीला 20 कोटींमध्ये विकला आहे. तर प्रिंट आणि प्रचाराचा एकुण खर्च मिळून हा सिनेमा वितरकांना 30 कोटींमध्ये पडला आहे.
'हीरोपंती' या सिनेमाचा टायगर श्रॉफशिवाय जो महत्त्वाचा भाग आहे, तो म्हणजे साजिद नाडियाडवाला यांचे असणे. साजिद यांना व्यावसायिक सिनेमांची जबरदस्त समज आहे आणि अन्य निर्मात्यांच्या तुलनेत त्यांचे यश हे जास्त आहे. त्यांच्या प्रत्येक सिनेमाचा लूक हा ग्रॅण्ड असतो.
एका नवोदिताला लाँच करणे हे मोठे जबाबदारीचे काम असते. त्यामुळे निर्माता साजिद नाडियाडवाला हीरोचे वडिल अर्थातच जॅकी श्रॉफ आणि प्रेक्षकांना निराश करणार नाहीत, अशी आशा व्यक्त केली जात आहे. जॅकी श्रॉफ यांना यशस्वी अभिनेत्यासोबतच एक चांगला माणुस म्हणून ओळखले जाते. त्यांच्या चांगुलपणाचा फायदा नक्कीच त्यांच्या मुलाला होईल.
'कोच्चाडियान' हा सुपरस्टार रजनीकांत यांचा सिनेमा आहे. या सिनेमाचा संपूर्ण निर्मिती खर्च केवळ त्याच्या तामिळ संस्करणातून निघेल, अशी आशा निर्माता इरोस इंटरनॅशनलला आहे.
गेल्या आठवड्यात हिमेश रेशमियाच्या 'द एक्सपोज' या सिनेमाने अपेक्षेपेक्षा जास्त चांगला व्यवसाय केला. 20 कोटी रुपये निर्मिती खर्च असेलल्या या सिनेमाचा ग्रॉस बिझनेस 12 कोटी रुपये झाला आहे. तर सॅटेलाइट, म्युझिक आणि अन्य हक्क विकून या सिनेमाने हिमेशचे 17 ते 18 कोटी रुपये वसूल करुन दिले आहेत. अभिनेता होण्याच्या महत्त्वकांक्षेपुढे 2 कोंटीचे नुकसान महत्त्वाचे ठरत नाही. हिमेशला 15 कोटींचा फटका बसेल, असे जाणकारांचे मत होते. मात्र तसे काही घडले नाही.
तर गेल्या आठवड्यातच रिलीज झालेल्या 'गॉडजिला' या सिनेमाने चांगले प्रदर्शन केले.