आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'टाइमपास\'ची कोटीची कोटी उड्डाणं, चार आठवड्यांत जमवला 28 कोटींचा गल्ला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : प्रेक्षकांना आपल्या पहिल्या प्रेमाची आठवण करुन देणारा रवी जाधव यांचा 'टाइमपास' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर कोटीची-कोटी उड्डाणं घेताना दिसतोय. या सिनेमाने रिलीजच्या चार आठवड्यांत बॉक्स ऑफिसवर 28 कोटींचा गल्ला जमवला आहे. याआधी मागील वर्षी आलेल्या 'दुनियादारी'ने मराठीत सर्वाधिक म्हणजे 32 कोटींची कमाई केली होती. आता त्यापाठोपाठ 'टाइमपास' हा सिनेमा 28 कोटींची कमाई करुन मराठीतील सर्वात वेगाने गल्ला जमावणारा सिनेमा ठरला आहे. त्यामुळे येत्या काळातही प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला तर 'टाइमपास' 'दुनियादारी'ला मागे टाकण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे 'डेढ इश्किया' आणि 'यारीया' हे हिंदीतील बिग बजेट सिनेमे थिएटरमध्ये सुरु असताना 'टाइमपास'ने ही कमाई केली आहे. एकंदरीतच दगडू आणि प्राजक्ताच्या केमिस्ट्रीने प्रेक्षकांना चांगलीच भूरळ घातली आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन वाचा, 'टाइमपास' सिनेमातील भन्नाट डायलॉग्स जे प्रेक्षकांच्या ओठी रेंगाळत आहेत.