आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : सिंगापूरमध्येही 'टाइमपास'ची क्रेझ, मिळाला हाउसफूल प्रतिसाद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अथांश कम्युनिकेशन्स आणि एस्सेल व्हिजन निर्मित 'टाइमपास' (टीपी) या चित्रपटाने मराठी चित्रपटांच्या इतिहासात अभूतपूर्व विक्रमाची नोंद केली आहे. हिंदी चित्रपटांची धामधूम सुरु असतानादेखील या चित्रपटाने 30कोटींपेक्षा जास्त बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर सातासमुद्रापलीकडेही दगडू-प्राजक्ताच्या दमदार केमिस्ट्रीने सिनेरसिकांना वेड लावले आहे. अलीकडेच 'टाइपास'ची टीम सिंगापूरला गेली होती. तिथे या चित्रपटाचे खास स्क्रनिंग ठेवण्यात आले होते. यावेळी संपूर्ण थिएटर प्रेक्षकांनी भरले होते. सिनेरसिकांचा 'टाइमपास'ला हाउसफूल प्रतिसाद मिळताना दिसला. या स्क्रिनिंगला 'टाइमपास'चे दिग्दर्शक रवी जाधव, प्रथमेश परब आणि केतकी माटेगावकर उपस्थित होते.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला रवी जाधव, प्रथमेश परब आणि केतकी माटेगावकर यांची सिंगापूरमधील काही खास छायाचित्रे दाखवत आहोत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा ही खास छायाचित्रे....