आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tina Ambani And Many Bollywood's Yesteryear Actresses Then And Now

58 वर्षीय टीनाच्या चेह-यावर दिसत नाही वाढत्या वयाचा प्रभाव, या 6 अॅक्ट्रेसचा बदलला Look

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(टीना मुनीम)

टीना मुनीम आपल्या काळातील ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक आहेत. 1975 मध्ये मिस टीन ब्युटी कॉन्टेस्टमध्ये सेकंड रनरअप राहिलेल्या टीना यांनी मिस फोटोजेनिक आणि मिस बिकिनी हे दोन किताब आपल्या नावी केले होते. टीना मुनीम यांचा आज 58 वा (11 फेब्रुवारी 1957) वाढदिवस आहे. एकेकाळी ग्लॅमरस गर्ल म्हणून ओळखल्या जाणा-या टीना आता एक समाजसेविका आणि बिझनेसवुमन आहेत. वयानुसार त्यांच्या लूकमध्ये थोडा बदल झालेला दिसून येतोय.
'देस-परदेस'मधून केले पदार्पण
1978मध्ये देव आनंद यांनी त्यांना 'देस-परदेस' या सिनेमाद्वारे बी टाऊनमध्ये लाँच केले होते. त्यानंतर ‘कर्ज’ (1980), ’लूटमार’ (1980), ’आपके दीवाने’(1980), ’खुदा कसम’ (1981) या सिनेमांमध्ये टीना झळकल्या होत्या. 1981मध्ये संजय दत्तचा पहिला सिनेमा असलेल्या 'रॉकी' या सिनेमातसुद्धा टीना झळकल्या होत्या. हा सिनेमा टीना यांच्या करिअरमधील सर्वाधिक गाजलेल्या सिनेमांपैकी एक आहे.
संजय दत्त आणि राजेश खन्नासोबत जुळले होते नाव...
रॉकी सिनेमाच्या शूटिंगवेळी टीना मुनीम यांचे नाव संजय दत्तसोबत जुळले होते. मात्र लवकरच राजेश खन्नासोबतचे त्यांच्या अफेअरचे किस्से रंगू लागले होते. 1981 से 1987 या काळात टीना आणि राजेश रिलेशनशिपमध्ये होते. टीना यांचे सिनेमात काम करणे राजेश यांना पसंत नव्हते. त्यामुळे दोघांत दुरावा निर्माण झाला. 1987 मध्ये राजेश खन्नांसोबतच्या ब्रेकअपनंतर टीना उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेल्या आणि बॉलिवूडला रामराम ठोकला.
अंबानी घराण्याच्या बनल्या सूनबाई..
याच काळात बिझनेसमन धीरुभाई अंबानी यांचे धाकटे चिरंजीव अनिल अंबानींची एन्ट्री टीना यांच्या आयुष्यात झाली. 1992मध्ये या दोघांनी लग्न केले. यांच्या लग्नाला 22 वर्षे पूर्ण झाली आहेत. टीना-अनिल यांना दोन मुले आहेत.
2012 मध्ये हॅलो मॅगझिनची कव्हरगर्ल बनलेल्या टीना आता बॉलिवूडपासून दूर असून पेज थ्री पार्टी किंवा इव्हेंट्समध्ये दिसत असतात. आजही त्यांचे सौंदर्य कायम आहे. वाढत्या वयाचा प्रभाव त्यांच्या चेह-यावर दिसून येत नाही. मात्र पूर्वीपेक्षा त्या आता लठ्ठ झाल्या आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा 70-80च्या दशकातील काही बॉलिवूड अभिनेत्रींचा लूक...