आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Today Is 70th Birth Anniversary Of Actor Vinod Mehra

Flashback:विनोद मेहरा यांची झाली होती साडे तीन लग्ने, रेखासोबत केला होता गांधर्व विवाह?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्रेः डावीकडे विनोद मेहरा, उजवीकडे वर पहिली पत्नी मोनासोबत विनोद मेहरा, मध्यभागी दुसरी पत्नी बिंदीया गोस्वामी आणि खाली अभिनेत्री रेखासोबत विनोद मेहरा)
चित्रपट उद्योगामध्ये अॅक्शनपेक्षाही जास्त प्रेमकथा बनल्या आहेत. त्यांच्या अपयशाची सरासरीदेखील अॅक्शन चित्रपटांपेक्षा जास्त आहे. यासोबतच चित्रपटसृष्टीतील लोकांमध्ये अनेक प्रेमकथा जन्मल्या आणि त्यांच्या अपयशाची टक्केवारीही जास्त आहे. सर्व सुंदर सिनेताऱ्यांनी कमीत कमी एकदा तरी प्रेम केले असेलच. त्यांनी प्रेमापेक्षा प्रेमाचे सोंगच जास्त रचले आहे. कारण अभिनयासाठी लावण्यात आलेला मेकअप हळूहळू त्वचेच्या सीमा पार करत त्यांच्या रक्तात आणि विचारांमध्ये समाविष्ट होतो. त्यांना स्वत:लाच कळत नाही की, कुठे अभिनय संपतो आणि कुठे ते वास्तवाच्या पृष्ठभागावर येतात. देवआनंद जेवढी वर्षे विवाहित राहिले, त्यापेक्षा कित्येक वर्षे ते आपल्या पत्नीपासून दूर राहिले. त्यांच्यामध्ये घटस्फोट झाला नाही, पण दुरावादेखील कधीच कमी झाला नाही.
आश्चर्याची बाब म्हणजे साधारण स्वरूपाच्या चेहऱ्याचे अभिनेते विनोद मेहरा यांची पडद्यावरील प्रतिमा एका सामान्य शेजाऱ्यासारखी होती आणि ते कधीच सुपरस्टारपद मिळवू शकले नाहीत. मात्र, १९७१ पासून ते १९९० पर्यंत १९ वर्षांमध्ये त्यांनी १०० चित्रपटांमध्ये अभिनय केला. तसेच बालकलाकाराच्या रूपातही त्यांनी 'नरसी भगत' आणि 'शारदा'मध्ये अभिनय केला आहे. किशोरवयात 'अंगुलीमाल'मध्येही काम केले आहे. ते १९७१ मध्ये राजकुमार, हेमा मालिनी आणि राखी अभिनीत 'लाल पत्थर'मध्ये युवा नायकाच्या रूपात सादर झाले. त्यांचा मृत्यू केवळ ४५ वर्षांचे असताना झाला. तेव्हा ते 'गुरुदेव' नामक आपल्या पहिल्या चित्रपटाचे निर्माते-दिग्दर्शक होते. एवढ्या कमी काळात सामान्य दिसणाऱ्या या अभिनेत्याचे काही प्रेमप्रसंग घडले आणि साडेतीन लग्नदेखील झाले.
विनोद मेहरा यांच्या पत्नींविषयी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...