मुंबईः दिग्दर्शक आर. बाल्की यांच्या आज रिलीज झालेल्या 'शमिताभ' या सिनेमात एका नवीन रुपात दिसणारे
अमिताभ बच्चन केवळ अभिनयातच नव्हे तर शिक्षणातही अग्रेसर आहेत. नैनीताल येथील शेरवूड कॉलेजमध्ये त्यांचे शिक्षण झाले. त्यांना परदेशी विद्यापीठाकडून मानद उपाधीने सन्मानित करण्यात आले आहे.
एकीकडे सलमान आणि
आमिर खानसारखे बॉलिवूडचे आघाडीचे कलाकार बारावीपर्यंतच शिकले आहेत, तर अमिताभसह विद्या बालन,
जॉन अब्राहम, प्रिती झिंटासह काही सेलिब्रिटी अभिनयासोबत शिक्षणातही पुढे आहेत. खरं तर अभिनयासाठी उच्च शिक्षणाची गरज नसते, मात्र या सेलिब्रिटींनी अभिनयात नशीब आजमावण्यापूर्वी शिक्षण पूर्ण करण्यावर भर दिला. काही सेलिब्रिटींनी एखाद्या विषयात केवळ आवड होती म्हणून पदवी प्राप्त केलेली आहे.
एक नजर टाकुया बॉलिवूडमधील उच्चशिक्षित सेलिब्रिटींवर...
अमिताभ बच्चनः नैनीताल येथील शेरवूड कॉलेजमधून घेतले शिक्षण..
बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन बालपणापासूनच अभ्यासात हुशात होते. बालपणी अभिनयात त्यांना रुची नव्हती. अमिताभ यांनी नैनीताल येथील शेरवूड कॉलेजमधून पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर दिल्ली युनिव्हर्सिटीच्या किरोडीमल कॉलेजमधून विज्ञान आणि आर्ट्स या दोन विषयीत पदवी प्राप्त केली. ऑस्ट्रेलियाच्या क्विन्सलँड युनिव्हर्सिटीने त्यांना डॉक्टरेटची मानद उपाधि देऊन सन्मानित केले आहे.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून बी टाऊनच्या आणखी काही उच्चशिक्षित सेलिब्रिटींविषयी...