आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Top 20: Things You Didn\'t Know About Actress Madhubala

FACTS: मधुबालाने बालवयातच कामास केली होती सुरुवात, इंग्रजीत होती आडाणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदी सिनेसृष्टीत एकापेक्षा एक सौंदयवतीने आपल्या सौंदर्याचे मोहिनी घातली आहे. मात्र 1940च्या दशकात एक अशी अभिनेत्री होती जिच्या सौंदर्याची भूरळ आजही लोकांवर कायम आहे. ही अभिनेत्री आज या जगात नाही, मात्र लोक आजही तिला विसरु शकलेले नाहीत. या अभिनेत्री नाव आहे मधुबाला. मुगल-ए-आझम या सिनेमात मधुबालाने साकारलेली अनारकलीची भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे.
या सौंदर्यसम्राज्ञीचा जन्म 14 फेब्रुवारी 1933 रोजी दिल्लीतील एका मुस्लिम कुटुंबात झाला होता. 1942 मध्ये 'बसंत' या सिनेमाद्वारे तिने बालकलाकाराच्या रुपात पहिल्यांदा पडद्यावर एन्ट्री घेतली. त्यावेळी तिचे वय होते अवघे नऊ वर्षे. तर अभिनेत्री म्हणून 1947मध्ये 'नीलकमल' या सिनेमात ती पहिल्यांदा झळकली होती. याचवर्षी तिचा आणखी एक सिनेमा रिलीज झाला होता. 'दिल की रानी' हे तिच्या दुस-या सिनेमाचे नाव होते. तर 1948मध्ये तिचा 'अमर प्रेम' हा सिनेमा रिलीज झाला. या सर्व सिनेमात ती राज कपूर यांच्यासोबत झळकली होती.
14 फेब्रुवारी 1933 रोजी जन्मलेल्या मधुबालाने 23 फेब्रुवारी 1969 रोजी या जगाचा निरोप घेतला. आपल्या करिअरमध्ये ती एकुण 66 सिनेमांमध्ये प्रमुख अभिनेत्री म्हणून झळकली होती. काल (14 फेब्रुवारी) मधुबालाची 81वी जयंती होती. याचनिमित्ताने आम्ही तुम्हाला तिच्याविषयीच्या काही खास गोष्टी सांगत आहोत.
मधुबालाचे खरे नाव मुमताज बेगम जहां देहलवी होते. तिला एकुण दहा बहीणभावंड होती. मधुबाला आपल्या आईवडिलांची पाचवी मुलगी होती. बालवयातच काम करायला सुरुवात केल्यामुळे मधुबाला कधी शाळेत जाऊ शकली नव्हती. तिला उर्दू भाषा येत होती, परंतु इंग्रजीचा एकही शब्द तिला बोलता येत नव्हता.
मधुबालाविषयी आणखी बरंच काही जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...