आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'DAY SPL: हनी सिंहला चित्रगंदासह संसार थाटण्याची होती इच्छा!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'हजारो ख्वाहिशे ऐसी' आणि 'देसी बॉइज'सारख्या सिनेमांमध्ये अभिनय करणारी बॉलिवूड अभिनेत्री चित्रगंदा सिंह आज 38 वर्षांची झाली आहे. तिचा जन्म 28 मार्च 1976मध्ये मेरठ, उत्तर प्रदेशच्या एका जाट कुटुंबात झाला होता. चित्रगंदाचा भाऊ दिग्विजय सिंह एक गोल्फर आहे. मॉडेलिंगमधून आपल्या करिअरला सुरूवात करणारी 2005पासून बॉलिवूडशी निगडीत आहे.
स्मिता पाटील यांच्याशी होते तुलना
चित्रगंदाचा चेहरा दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांच्या चेह-याशी मिळता-जुळता आहे असे म्हटले जाते. सिनेमा निर्माता शेखर कपूर यांनी जेव्हा 2003मध्ये तिला 'हजारो ख्वाहिशे ऐसी'मध्ये बघितले तेव्हा ते म्हणाले होते, 'तू स्मिता पाटील यांनासुध्दा टक्कर दिली.'
लग्नानंतर केली सिनेमात एंट्री
लग्नानंतर अधिकतर अभिनेत्री बॉलिवूडमधून सन्यास घेतात. परंतु चित्रगंदाने लग्नानंतर बॉलिवूडमध्ये एंट्री केली. तिने 2001मध्ये प्रसिध्द गोल्फर ज्योति रंधावासोबत लग्न केले आणि जवळपास दोन वर्षांनी अर्थातच 2003मध्ये 'हजारो ख्वाहिशे ऐसी'मधून मोठ्या पडद्यावर झळकली. परंतु 2003मध्ये ती तिच्या पतीपासून विभक्त झाली.
अनेक सिनेमांमध्ये केले काम
बॉलिवू़डमध्ये चित्रगंदाला चांगली प्रसिध्दी मिळू शकली नाही परंतु ती आतापर्यंत जवळपास 10 सिनेमांमध्ये दिसली आहे. त्यामध्ये अक्षय कु्मार आणि जॉन अब्राहम अभिनीत 'देसी बॉइज' आणि इरफान खान अभिनीत 'ये साली जिंदगी'सारखे सिनेमे सामील आहेत. 'काल: एस्टरडे अ‍ॅट टुमारो' (2005), 'सॉरी भाई' (2008), 'जोकर' (2012) आणि 'आय मी और मै'(2013) हे तिच्या काही सिनेमांची नाव आहेत.
अनेक वादात अडकली आहे चित्रगंदा
चित्रगंदाला अभिनयाच्या क्षेत्रात प्रसिध्दी मिळाली नसेल परंतु वादातून तिने बरेच नाव कमवले आहे. सिनेमापासून ते तिच्या खासगी आयुष्यापर्यंत ती अनेक वादात अडकली आहे. मग तो टि्वटरवर पूनम पांडेसोबत झालेले वाद असो अथवा पतीपासून विभक्त होण्याचा वाद. तिची प्रतिमा एक वादग्रस्त अभिनेत्री म्हणून झाली आहे. जाणून घेऊया तिच्या काही वादाविषयी.
हनी सिंहने लग्न करण्याची व्यक्त केली होती इच्छा
प्रसिध्द रॅपर हनी सिंहने जेव्हा तिच्यासोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती तेव्हा चित्रंगदा सिंह पुन्हा एकदा चर्चेत आली होती. त्यावेळी तिचे विवाहित जीवन व्यवस्थित चालू होते आणि हनी सिंहचेसुध्दा लग्न झालेले होते. हनी सिंहने चित्रगंदाला एका मुलाखतीत 'गॉडेस' म्हणून संबोधले होते. मुलाखतीत हनी सिंह म्हणाला होता, 'जर ती माझ्या आयुष्यात येण्यास तयार असेल तर मी तिला एखाद्या राणीप्रमाणे ठेवेल. तिचा मुलगा जोरावरची जबाबदारीसुध्दा माझीच असेल आणि तिचा पती ज्योति रंधावासोबतसुध्दा मी बोलून घेईल. ती गॉडेस आहेस.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या तिच्या खासगी आयुष्याशी संबंधीत काही वाद...