आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Trailer out: \'खूबसूरत\'मध्ये सोनम आहे बिनधास्त डॉक्टर, पाहा Video आणि PIX

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Khoobsurat Official Trailer | Sonam Kapoor, Fawad Khan | Releasing - 19 September - Divya Marathi
Khoobsurat Official Trailer | Sonam Kapoor, Fawad Khan | Releasing - 19 September
'खूबसूरत'चा ट्रेलर
मुंबई: शशांक घोषच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या 'खूबसूरत' सिनेमाचा ट्रेलर काल (21 जुलै) मुंबईमध्ये लाँच करण्यात आला. ट्रेलर इव्हेंटमध्ये सोनम कपूर, फवाद अफजल खान, रिया कपूर आणि सिध्दार्थ राय कपूरसुध्दा उपस्थित होते.
2 मिनीट 20 सेकंदाचा हा ट्रेलर पूर्णत: सोनमवर चित्रीत करण्यात आला आहे. त्यामध्ये निर्मला देवी राठोड एक राणी आहे. तिला राजमहलातील वस्तूंची खूप जवळीक असते. मात्र मिली चक्रवर्ती आल्यानंतर त्यातील काही वस्तूचे नुकसान होते. मिली एक फिजियोथेरपिस्ट आहे. सोनम सिनेमात बडबड्या स्वभावाची मुलगी आहे. ट्रेलरमध्ये 'इंजन की सिटी मे' हे सिनेमाचे गाणेसुध्दा दाखवण्यात आले आहे.
हा सिनेमा 1980मध्ये आलेल्या 'खूबसूरत'चा रिमेक आहे. त्यामध्ये रेखाने मुख्य भूमिका साकारली होती. सोनमची बहीण रिया कपूर आणि वडील अनिल कपूर हे सिनेमाचे निर्माते आहेत. 19 सप्टेंबर रोजी सिनेमा रिलीज होणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'खूबसूरत'च्या ट्रेलरमधून घेण्यात आलेली सोनमची काही छायाचित्रे...