आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Trailer Out Of Ranveer Singh And Parineeti Chopra Movie Kill Dil

Trailer Out: लव्ह, अॅक्शन आणि ड्रामाचे कॉकटेल आहे 'किल दिल'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('किल दिल'च्या एका दृष्यात रणवीर सिंह आणि गोविंदा)
मुंबईः रणवीर सिंह आणि परिणीती चोप्रा स्टारर 'किल दिल' या आगामी सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. ट्रेलरमध्ये या दोघांसह अली जाफर आणि गोविंदासुद्धा दिसत आहेत. 2 मिनिटे 13 सेकंदांचा हा ट्रेलर आहे.
ट्रेलरमध्ये काय आहे?
सिनेमाच्या ट्रेलरची सुरुवात अली जाफरच्या डायलॉगने झाली आहे. त्यानंतर रणवीर सिंहची एन्ट्री दाखवण्यात आली आहे. रणवीर स्नाइपर गन चालवताना दिसतोय. ट्रेलरमध्ये परिणीती पंजाबीत बोलताना दिसत आहे. तर गोविंदाच्या तोंडी 'बिना बोलो ले लेंगे' हा संवाद आहे. ट्रेलरचा शेवट गोविंदाच्या हसण्याने आणि रणवीरत्या 'बच्चा पैदा कहीं भी हो, बनता वैसा ही है जहां बड़ा होता है' या डायलॉगने होतो.
परिणीती आणि रणवीरचा किसींग सीन...
ट्रेलरमध्ये फारसे बोल्ड सीन्स नाहीयेत. मात्र स्वीमिंग पूलमधील एका दृष्यात रणवीर आणि परिणीती लिपलॉक करताना दिसत आहेत. हा सीन्स काही सेकंदातच संपतो. या ट्रेलरमध्ये परिणीती बाइक चालवतानासुद्धा दिसतेय.
'किल दिल' हा सिनेमा शाह अली यांनी दिग्दर्शित केला असून आदित्य चोप्रा याचा निर्माता आहे. येत्या 14 नोव्हेंबर रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा या ट्रेलरची छायाचित्रे आणि व्हिडिओ..