आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: पाहा ऋचा आणि निखिल स्टारर 'तमंचे'चा ट्रेलर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(तमंचेचा ट्रेलर पाहण्यासाठी वर क्लिक करा...)
मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री ऋचा चड्ढा आणि निखिल द्विवेदी अभिनीत 'तमंचे' या सिनेमाचे ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. ट्रेलरमध्ये हे दोघेही चोरी करताना दिसत आहेत. शिवाय त्यांची मजेशीर लव्हस्टोरीसुद्धा मध्येमध्ये बघायला मिळत आहे. ट्रेलरच्या बॅकग्राउंडमध्ये महान या सिनेमातील 'प्यार में दिल पे मार दी गोली...' हे गाणे वाजत आहे. हे गाणे ऋचा आणि निखिलवर अगदी फिट बसत आहे,
अलीकडेच बातमी आली होती, की बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानने आपल्या बिझी शेड्युलमधून या सिनेमाच्या एडिटिंगला वेळ दिला होता. गँग्स ऑफ वासेपूर, रामलीला आणि फुकरे या सिनेमांमधून आपल्या अभिनयाची वेगळी छाप सोडणा-या ऋचा चड्ढाला या सिनेमाकडून ब-याच अपेक्षा आहेत. फॅशन टीव्ही फिल्म्स आणि सूर्यवीर सिंह भूल्लर निर्मित हा सिनेमा यावर्षी 19 सप्टेंबरला बॉक्स ऑफिसवर दाखल होणार आहे.