वरील छायाचित्रावर क्लिक करून पाहा राणीच्या 'मर्दानी'चा ट्रेलर
मुंबई: दिर्घकाळानंतर राणी मुखर्जी पडद्यावर पुनरागमन करत आहे. लग्नानंतर राणी मुखर्जी तिच्या 'मर्दानी'मध्ये पूर्णत: नवीन अवतारात दिसणार आहे. 'मर्दानी'चा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. ट्रेलरमध्ये राणी निरागस हिरोइन नव्हे तर मुंबई ब्रांचची इन्स्पेक्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमा वुमेन ट्रॅफिकिंगसारख्या संवेदनशिल विषयावर आधारित आहे.
हा राणीचा कमबॅकचा सिनेमा आहे. त्यामध्ये ती पहिल्यांदा पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमाचा निर्मात तिचा पती आदित्य चोप्रा असून दिग्दर्शक प्रदीप सरकार आहे. हा सिनेमा 22 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. सिनेमाचा ट्रेलर पाहून असे जाणवते, की राणी आपल्या नवीन आयुष्यासाठी पूर्णत: तयार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'मर्दानी'च्या ट्रेलरमधून घेतलेले 10 निवडक छायाचित्रे...