आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बँग बँग'च्या 'तू मेरी...' या गाण्यात दिसेल हृतिकच्या अफलातून डान्सची झलक, पाहा TEASER

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन)
मुंबई - युट्यूबवर 'बँग बँग' या आगामी सिनेमाच्या टीजरने हिट्सचा नवीन रेकॉर्ड प्रस्थापित केला. आता फॉक्स स्टार स्टुडिओ आपल्या या सिनेमातील 'तू मेरी...' हे गाणे लाँच करण्यासाठी सज्ज झाले आहे. हृतिक रोशनने हे गाणे शूट करण्यासाठी जीवतोड मेहनत घेतली आहे.
'बँग बँग' या सिनेमातील 'तू मेरी...' हे गाणे सिनेमातील एनर्जेटिक गाणे असल्याचे सांगितले जात आहे. विशाल-शेखर या संगीतकार जोडीने हे गाणे कंपोज केले आहे. या गाण्यात हृतिक रोशनचे नवीन डान्स मुव्स दिसणार असून कतरिना कैफसुद्धा वेगळ्या अंदाजात झळकणार आहे. ब-याच दिवसांनी हृतिक रोशन या गाण्यात फुलटू डान्स अवतारमध्ये दिसेल. या गाण्याचे अलीकडेच एक टीजर रिलीज करण्यात आले आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा 'बँग बँग' या सिनेमाचे आणि 'तू मेरी...' या गाण्याचे टीजर...