Home »Marathi Katta» Tuza Maza Jamena On Zee Marathi From 13th May (Mon- Sat @9pm)

PHOTOS : सासू सुनेच्या नात्यातली गंमत सांगणारी मालिका 'तुझं माझं जमेना'

दिव्य मराठी वेब टीम | May 06, 2013, 09:59 AM IST

हिंदी आणि मराठी सिनेमा आणि नाट्यसृष्टीत आपली जबरदस्त मोहोर उमटवणारे अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी आता टेलिव्हिजन क्षेत्रात पदार्पण केले आहे. महेश मांजरेकर यांची पहिलीच निर्मिती असलेली मराठी मालिका आता लवकरच झी मराठी वाहिनीवर दाखल होत आहे. 'तुझं माझं जमेना' हे नाव आहे महेश मांजरेकर यांची निर्मिती असलेल्या मालिकेचं.

'तुझं माझं जमेना' ही मालिका शीर्षकावरुनत सासू सुनेच्या नात्यातली गंमत सांगणारी मालिका आहे, हे आपल्या लक्षात आलंच असेल. मात्र तरीदेखील ही मालिका इतर मालिकांपेक्षा नक्कीच वेगळी असेल, असा दावा महेश मांजरेकर यांनी केला आहे.

या मालिकेविषयी महेश मांजरेकर यांनी सांगितले की, ''ही आजच्या काळातल्या सासू सुनेची गोष्ट आहे. या सासू सुनांच्या एकमेकीबाबत कुरबुरी नक्की असतील, मात्र त्या परस्परांच्या विरोधात कट कारस्थानं करणा-या नाहीत. खरं पाहता या सासू सुनांपेक्षा दोघांच्या मध्ये अडकलेल्या पुरुषाची ही कथा आहे. ज्याला आईचं म्हणणं पुरेपूर पटंत आणि बायकोलाही दुखवायचं नसतं. सासूसुनेच्या वादविवादात फसलेल्या मुलाची ही गोष्ट आहे. तरीदेखील ती सासू सुनेचं विश्व अधोरेखित करते. दोघींच्या नात्यांचे अर्थ उलगडून दाखवणारी आणि मानवी स्वभावाचे कंगोरे अधोरेखित करणारी ही मालिका आहे.''

आपल्या मतांशी ठाम असणारी, शिस्तप्रिय, करारी आणि मनाने तितकीच हळवी, प्रेमळ अशी सासू रंगवलीय अभिनेत्री रीमा यांनी. रीमा अनेक वर्षांनी छोट्या पडद्यावर आणि तेही मराठी मालिकेत झळकणार आहेत. तर सुनेच्या भूमिकेत आहे मनवा नाईक.

या मालिकेविषयी आणखी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

Next Article

Recommended