मुंबई - सिनेमाची रिलीज डेट जवळ येत असली, की बॉलिवूड कलाकार आपल्या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी होताना दिसतात. आता हाच ट्रेंड मराठी सिनेसृष्टीतही दिसून येतोय. सिनेमा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी मराठी कलाकार जास्तीत जास्त मेहनत घेत आहे. अभिनेत्री श्रुती मराठे आणि अभिनेता गौरव घाटणेकरसुद्धा आपल्या आगामी 'तुझी माझी लवस्टोरी' या सिनेमाच्या प्रमोशनला लागले आहेत.
अलीकडेच हे दोघे सिनेमाच्या प्रोमोशननिमित्त मुंबईतील वॉटर किंग्डममध्ये पोहोचले. यावेळी श्रुती आणि गौरवने लाईव डान्स परफॉरमन्स दिला. दोघेही यावेळी रोमॅंटिक मूडमध्ये दिसले. दोघांच्याही लाईव डान्स परफॉरमन्सला प्रेक्षकांची मनमुराद दाद मिळाली. यावेळी गौरवने आपल्या चाहत्यांच्या प्रेमळ मागण्या पुरवल्या. तर श्रुती मराठेलासुद्धा तिच्या एका चाहत्याने प्रपोज केले.
यावेळी श्रुती आणि गौरवसह सिनेमाचे दिग्दर्शक ऋषिकेश मोरेसुद्धा उपस्थित होते. 'तुझी माझी लवस्टोरी' मध्ये श्रुती मराठे, गौरव घाटणेकर यांच्यासह संकेत मोरे, कल्पना साठे, उदय लागू, नेहा बाम, मृणालिनी जांभळे, अशोक कुलकर्णी, श्रीकांत कामत, वरद चव्हाण, प्रशांत नेमन या कलाकारांच्या भूमिका असून तरुणाईला आवडेल अशा पद्धतीने या सिनेमाची मांडणी करण्यात आली आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा सिनेमाच्या प्रमोशनवेळी क्लिक करण्यात आलेली ही खास छायाचित्रे...