आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Twitterati Expresses Shock As ‘Humshakals’ Earns Rs 40 Crore At Box Office

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

HUMSHAKALSची कमाई पाहून सर्वच हैराण! टि्वटर यूझर्सने प्रेक्षकांवर उपस्थित केले प्रश्न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टि्वटरवर यूझर्स सिनेमा दिग्दर्शक साजिद खान यांच्यावर अशाप्रकारे राग व्यक्त करत आहेत.
नवी दिल्ली: दिग्दर्शक साजिद खानच्या 'हमशकल्स'कडून पहिल्या आठवडयात 40 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाईचा दावा केला जात आहे. सिनेमा समीक्षकांनी या सिनेमावर बरीच टिका केली होती. काहींनी तर याला इतिहासातील सर्वात वाईट सिनेमा म्हणून करार दिला होता. या सिनेमाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमुळे सर्वजण अचंबित झाले आहे. सोशल साइट्सवरसुध्दा लोकांच्या आश्चर्यकारक कमेन्ट्स येत आहेत. टि्वटरवर या सिनेमाचे अनेक जोक्ससुध्दा तयार झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक चर्चेतील जोक म्हणजे, 'ज्या देशात हमशकल्ससारखा सिनेमा 3 दिवसांत 40 कोटी रुपये कमावू शकतो त्या देशात रेल्वे भाडेवाढीवर तक्रार करण्याचा काहीच हक्क नाहीये.' (पुढील स्लाइड्सवर आणखी काही टि्वट दिले आहेत.)
EXPERT COMMENTS:
दीपांजना पाल (फस्टपोस्टमध्ये): 'हमशकल्स' प्रत्येक गोष्टीचा आपमान करणारा आहे. तरीदेखील त्याच्या विरोधात कोणतीही तक्रार नाहीये. आरएसएस प्रेरित भारत संस्कृतीचे रक्षकसुध्दा गप्प आहेत. कोणीच म्हणत नाहीये, की 'हमशकल्स' आपल्या भारतीय संस्कृतीच्या मुळ भावनांना ठेच पोहोचवणारा आहे. 'हमशकल्स'ची कॉमेडी जर आपल्याला चालू शकते, तर एखाद्या तशाप्रकारच्या पुस्तकाविषयी गोंधळ घालण्याचा कोणला काहीही अधिकार नाहीये. आपण जी नवीन संस्कृती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत त्यात मुर्खपाणा जास्त वाटत आहे.

पहिल्या आठवड्यात सर्वाधिक कमाई करणारा चौथा सिनेमा
साजिद खानच्या या सिनेमाने पहिल्या आठवड्यात 40.13 कोटी कमावून यावर्षीचा सर्वाधिक कमाई करणारा चौथा सिनेमा ठरला आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, सिनेमाने शुक्रवारी (20 जून)12.50 कोटी शनिवारी (21 जून) 12.59 कोटी आणि रविवारी (22 जून) 15.04 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. अशाप्रकारे सिनेमाने पहिल्या आठवड्यात सर्वाधिक कमाई करणा-या सिनेमाच्या यादीत स्थान मिळवले. पहिले तीन सिनेमे- 'जय हो' (60.68 कोटी), 'गुंडे' (43.93 कोटी) 'हॉलिडे' (41.32 कोटी)
पाच कारणे, समीक्षकांच्या टिकेनंतरही 'हमशकल्स' ठरला हिट
1. ब-याच समीक्षकांनी सिनेमाला शून्य रेटींग दिले. ते बॉलिवूड सिनेमासाठी रेकॉर्ड होता. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये सिनेमा बघण्याविषयी उत्सूकता निर्माण झाली.
2. प्रीमिअरपूर्वी खूपच साध्या आणि योजनाबध्द पध्दतीने सिनेमा आणि म्यूझिकचे प्रमोशन करण्यात आले. सिनेमाचे 'कॉलर ट्यून' गाणे खूप हिट झाले.
3. साजिद खान कोणताही बेस नसलेली कॉमेडी तयार करण्यासाठी ओळखला जातो. त्यामुळे समीक्षक त्याच्याकडून काहीच अपेक्षा करू शकत नाही. याव्यतिरिक्त सिनेमात सैफ अली खान, रितेश देखमुख आणि राम कपूरसारखे स्टार्स ट्रीपल भूमिकेत होते. ग्लॅमरची फोडणी देण्यासाठी बिपाशा बसु, ईशा गुप्ता आणि तमन्नासारख्या अभिनेत्री होत्या. या अभिनेत्रीसुध्दा सिनेमा हिट करण्यासाठी एक प्लस पॉइंट मानल्या जाऊ शकत्या.
4. या शुक्रवारी दुसरा कोणताही मोठा सिनेमा रिलीज झाला नाही. ज्या लोकांना फुटबॉल विश्वकपमध्ये रुची नाही तेसुध्दा सिनेमा बघण्यासाठी जात आहेत.
5. सोशल साइट्सवर या सिनेमाची इतकी खिल्ली उडवण्यात येत आहे, की सिनेमाला मोफत प्रसिध्दी मिळाली. त्यामुळेसुध्दा प्रेक्षकांचा सिनेमाबद्दल उत्सूकता निर्माण झाली.
'हमशकल्स'ला कोणी किती स्टार दिले?
फिल्‍मफेयरच्या रचित गुप्‍ता: 2 स्‍टार

टाइम्‍स ऑफ इंडियाच्या सृजन मित्रा दास: 2.5 स्‍टार

आईबीएनच्या राजीव मसंद: 0.5 स्‍टार

हिंदुस्‍तान टाइम्‍सच्या सरित रे: 0.5 स्‍टार

इंडियन एक्‍सप्रेसच्या शुभ्रा गुप्‍ता: 0 स्‍टार

एनडीटीवी.कॉमच्या साइबल चटर्जी: 0.5 स्‍टार

इंडिया टुडेच्या सुहानी सिंह: 0.5 स्‍टार
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'हमशकल्स'ची सोशल साइट्सवर कशी खिल्ली उडवली जातेय...