मुंबई: कोलकातामधील दोन मॉडेलने मुंबईच्या जय तिमनलाल देसाई नावावच्या टीव्ही निर्मात्यावर लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. मालिकांमध्ये काम करण्यासाठी एक रात्र माझ्यासोबत घावलाली लागेल, असे या निर्मात्या म्हटले. लैंगिक शोषण केलेल्या या निर्मात्याला पोलिसांनी अटक केली आहे.
निर्मात्याने सांगितले, की त्याने मॉडेलला टेलिफिल्म्सच्या भूमिकेसाठी करार साइन करण्यासाठी आणि 11, 000 रुपये आगावू देण्याच्या बहाण्याने एका हॉटेलमध्ये भेटण्यास बोलावले होते. शुक्रवारी 6 वाजता ही मॉडेल तिचा मित्र बालीगंज परिसरातील एक हॉटेलमध्ये पोहोचली. देसाईने दोन्ही तरुणींना
आपल्यासोबत एक रात्र घालवण्यास सांगितले. मॉडेल्सच्या विरोधानंतरही त्या निर्मात्याने त्यांचे लैंगिक शोषण केले. पोलिसांनी या मॉडेल्सच्या तक्रारीनंतर देसाई नावाच्या निर्मात्याला गढघाट पोलिसांनी अटक केली. कोर्टाने निर्मात्याला 26 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवले असून शनिवारी (27 सप्टेंबर) कोर्टात हजर करण्यात येणार आहे.
दोन्ही मॉडेल आसामच्या रहिवाशी असून त्या नातेवाईकांसोबत शहरात राहतात. आरोपी निर्माता स्वत:ला प्रसिध्द निर्माता असल्याचा दावा करत आहे. मात्र त्याने यापूर्वीसुध्दा असे अनेक प्रकरण केले असल्याची शंका पोलिसांना आहे.