आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सचिन खेडेकरांच्या हस्ते 'उचल्या'चा मुहूर्त क्लॅप

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या मराठीत चित्रपटांच्या विषयांसंबंधी एक नवीन ट्रेंड आलाय. तो म्हणजे अनेक गाजलेल्या कादंबरीवर आधारीत विषयांवर चित्रपट तयार करणे. नटरंग, पांगिरा या कलाकृतींनंतर आता ज्येष्ठ समाजसेवक लक्ष्मण गायकवाड लिखीत ’उचल्या’ या कादंबरीवर मराठी चित्रपट बनविला जात आहे. ’हुप्पा हुय्या’ या चित्रपटाचे निर्माते अमर कक्कड आणि पुष्पा कक्कड यांनी ही कथा रूपेरी पडद्यावर आणण्याचे ठरविले आहे. दिग्दर्शक समीत कक्कड ’उचल्या’चे दिग्दर्शन करणार आहे.

नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त पार पडला. राष्ट्रीय पुरस्कार विजेता बालकलाकार विवेक चाबुकस्वार याच्यावर हा मुहूर्त शॉट चित्रीत करण्यात आला. अभिनेता सचिन खेडेकर यांच्या हस्ते मुहूर्ताचा क्लॅप देण्यात आला. 'उचल्या' या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी संजय जाधव करणार आहेत.

भूक आणि निवा-यासाठी सर्व कायदेशीर रस्ते बंद झाल्यामुळे चोरी करुन जगणारी उचल्या ही जमात आहे. तर दुसरीकडे कोट्यावधी रुपयांची कायदेशीर चोरी करणारे प्रतिष्ठित, सुशिक्षित पांढरपेक्षे लोक आहेत. लाच आणि भ्रष्टाचारावर लाखो रुपये मिळवणारी माणसे गुन्हेगार समजली जात नाहीत. मात्र पोटासाठी चोरी करणारे गुन्हेगार समजले जातात. या जळजळीत वास्तवावर या चित्रपटातून भाष्य करण्यात येणार आहे. लवकरच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करण्यात येणार आहे.

पाहा, 'उचल्या' या मराठी चित्रपटाच्या मुहूर्ताची ही खास छायाचित्रे...