आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Watch: Udita Goswami And Mohit Suri Wedding Album

9 वर्षे डेटिंग केल्यानंतर या अभिनेत्री केले होते लग्न, पाहा Wedding Album

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः लग्नात मोहित सूरी आणि उदिता गोस्वामी)
मुंबईः बॉलिवूडमध्ये 'पाप' या सिनेमाद्वारे फिल्म इंडस्ट्रीत डेब्यू करणा-या अभिनेत्री उदिता गोस्वामीने गोंडस मुलीला जन्म दिला आहे. उदिता प्रसिद्ध दिग्दर्शक मोहित सूरीची पत्नी आहे. उदिता आणि मोहितच्या घरी मुलीचा जन्म झाल्याची बातमी निर्माते-दिग्दर्शक महेश भट्ट यांनी शेअर केली आहे.
महेश भट्ट यांनी ट्विट केले, “Mohit Suri and Udita have received a gift from the Gods! A baby girl has just descended from the 'skies' into their life,".
मोहित आणि उदिताचे लग्न 2013 मध्ये झाले होते. लग्नापूर्वी नऊ वर्षे हे दोघे रिलेशनशिपमध्ये होते. मोहित सूरीची मामेबहीण असलेल्या पूजा भट्टने 'पाप' या सिनेमाद्वारे उदिताला फिल्म इंडस्ट्रीत लाँच केले होते. उदिताने आपल्या करिअरमधील 'जहर' हा दुसरा सिनेमा मोहित सूरीसोबत केला होता. हा सिनेमा मोहित सुरीने दिग्दर्शित केला होता. याचकाळात दोघांचे सूत जुळले होते.
मोहित-उदिताच्या लग्नात पोहोचले होते अनेक सेलिब्रिटी
मोहित सूरी आणि उदिता गोस्वामीचे लग्न पारंपरिक पद्धतीने झाले होते. मोहितने लग्नात व्हाइट कुर्ता-पायजामा आणि हाफ जॅकेट परिधान केले होते. तर उदिता रेड कलरच्या लहेंगा चोलीत दिसली होती. या दोघांना भावी आयुष्याच्या शुभेच्छा देण्यासाठी महेश भट्ट, कंगना रनोट, विक्रम भट्ट, श्रद्धा कपूर, जॅकलीन फर्नांडिस, गोविंदा, केन घोष, दीया मिर्जा, इमरान हाशमी, तनुश्री दत्तासह अनेक सेलिब्रिटी पोहोचले होते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा मोहित-उदिताच्या लग्नाचा खास अल्बम...