(बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि उदिता गोस्वामी)
मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री उदिता गोस्वामी आज
आपला 30वा वाढदिवस साजरा करत आहे. उदिता 29 जानेवारी 2013 रोजी दिग्दर्शक मोहित सुरीसोबत लग्नगाठीत अडकली होती. या लग्नात बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी आपली उपस्थिती लावली होती. भट्ट फॅमिली या लग्नात हजर होती. याशिवाय भट्ट कॅम्पमधील अभिनेत्रींनीसुद्धा हजेरी लावून उदिता आणि मोहितला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या.
मुंबईत एका खासगी समारंभात उदिता आणि मोहित लग्नगाठीत अडकले होते. या दोघांची भेट 'जहर' या सिनेमाच्या सेटवर झाली होती. हा सिनेमा मोहित सुरीने दिग्दर्शित केला होता. याचकाळात दोघांचे सूत जुळले होते. काही महिने डेटिंग केल्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला.
लग्नानंतर महालक्ष्मी रेसकोर्समध्ये 31 जानेवारी 2013 रोजी ग्रॅण्ड रिसेप्शन पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. रिसेप्शन पार्टीतसुद्धा बरेच सेलेब्स पोहोचले होते. गोविंदा त्याच्या पत्नी आणि मुलीसह येथे आला होता. याशिवाय कंगना रनोट, श्रद्धा कपूर, जॅकलिन फर्नांडिस रिसेप्शन पार्टीत उपस्थित होत्या. अलीकडेच मोहित सुरीच्या एक विलन या सिनेमाने शंभर कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा उदिता-मोहितचा वेडिंग अल्बम...