आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Actress Udita Goswami Gives Birth To Girl

उदिता गोस्वामीच्या घरी झाले नन्ही परीचे आगमन, महेश भट्ट यांनी दिली गोड बातमी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- पती मोहित सूरीसोबत उदिता गोस्वामी)
मुंबईः बॉलिवूडमध्ये 'पाप' या सिनेमाद्वारे फिल्म इंडस्ट्रीत डेब्यू करणा-या अभिनेत्री उदिता गोस्वामीने गोंडस मुलीला जन्म दिला आहे. उदिता प्रसिद्ध दिग्दर्शक मोहित सूरीची पत्नी आहे. उदिता आणि मोहितच्या घरी मुलीचा जन्म झाल्याची बातमी निर्माते-दिग्दर्शक महेश भट्ट यांनी शेअर केली आहे.
महेश भट्ट यांनी ट्विट केले, “Mohit Suri and Udita have received a gift from the Gods! A baby girl has just descended from the 'skies' into their life,".
मोहित आणि उदिताचे लग्न 2013 मध्ये झाले होते. लग्नापूर्वी नऊ वर्षे हे दोघे रिलेशनशिपमध्ये होते. मोहित सूरीची मामेबहीण असलेल्या पूजा भट्टने पाप या सिनेमाद्वारे उदिताला फिल्म इंडस्ट्रीत लाँच केले होते. उदिताने आपल्या करिअरमधील जहर हा दुसरा सिनेमा मोहित सूरीसोबत केला होता.
मुलीच्या आगमनामुळे मोहित खूप आनंदी आहे. सध्या तो 'हमारी अधूरी कहानी' या सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. 'एक व्हिलन' हा मोहितच्या दिग्दर्शनात तयार झालेला त्याचा शेवटचा सिनेमा होता.