आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सूर्यास्त... ‘उंच माझा झोका’मध्ये न्यायमूर्ती महादेवराव रानडे यांचं देहावसान

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘झी मराठी’वरील ‘उंच माझा झोका’ मालिकेत लवकरच एक अत्यंत दुःखद घटना पाहायला मिळणार आहे. ही घटना म्हणजे रमाबाईंचे पती – न्यायमूर्ती महादेवराव रानडे यांचं देहावसान. न्यायमूर्ती महादेवराव रानडे हे महाराष्ट्राच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्व. मात्र सार्वजनिक जीवनातील त्यांच्या सामाजिक कार्याइतकंच महत्त्वाचं होतं, त्यांनी त्यांच्या अशिक्षित पत्नीला – रमाबाई रानडे यांना दिलेलं शिक्षण. महादेवरावांनी रमाबाईंना लिहिण्यावाचण्याची गोडी तर लावलीच, शिवाय महादेवरावांच्या ठाम आग्रहामुळे आणि त्यांच्याच प्रेरणेमुळे रमाबाईही सामाजिक कार्यात उतरल्या.

महादेवराव आणि रमाबाई यांच्या वयात वीस वर्षांपेक्षा जास्त अंतर होतं तरीही या पती-पत्नीचं नातं दृष्ट लागण्याजोगं होतं. रमाबाई आणि महादेवराव यांनी सत्तावीस वर्षं संसार केला. मात्र महादेवरावांना तारुण्यातच डोळ्यांचा विकार जडला होता. तसंच कालांतराने त्यांची प्रकृती ढासळत गेली आणि 16 जानेवारी 1901 या दिवशी महादेवरावांचं निधन झालं. महादेवरावांच्या निधनानंतर रमाबाईंचं सौभाग्यच नाही, तर त्यांचं सर्वस्वच हरपलं.

महादेवराव रानडे यांचं देहावसान ही ‘उंच माझा झोका’ मालिकेतील सर्वांत हृदयद्रावक घटना आणि ती तितक्याच संवेदनशीलतेने दाखवली जाणार आहे. स्वतःला महादेवरावांची सावली मानणा-या रमाबाईंनी महादेवरावांच्या मृत्यूनंतर केलेलं कार्य यानंतर ‘उंच माझा झोका’ मालिकेत दाखवलं जाणार आहे.

रमाबाई रानडे यांचं कार्य जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...