आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Underworld Don Ravi Pujari Is Trying To Kill Mahesh Bhatt

महेश भट्ट यांच्या हत्येचा कट पोलिसांनी उधळला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीने 15 नोव्हेंबर रोजी निर्माता-दिग्दर्शक महेश भट्ट यांना जीवे मारण्याचा कट रचला होता. मात्र मुंबईच्या गुन्हे शाखा पोलिसांनी हा कट उधळून लावला आहे.
23 ऑगस्ट रोजी जुहूमध्ये निर्माते करीम मोरानी यांच्या घरावर गोळीबार करून हल्ला केल्याप्रकरणी 13 जणांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपींच्या चौकशीदरम्यान महेश भट्ट यांना मारण्याचे षडयंत्र रचले असल्याचा खुलासा झाला होता. पुजारीने मोरानी बंधुंना आणि महेश भट्ट यांना मारण्यासाठी 11 लाखांची सुपारी दिली होती. यातील 5 लाख रुपये मोरानी यांच्या गोळीबाराशी संबंधित आरोपींना मिळाले होते.
पुजारीने सुपारी देताना सांगितले होते, 'मोरानी गोळीबाराने फायदा झाला नाही, आता प्युअर शॉट द्या', असा खुलासा शूटर्सनी चौकशीदरम्यान केला.
मुंबई पोलिसांनी काल (17 नोव्हेंबर) झालेल्या एका पत्रकार परिषदेत पुजारी गँगच्या मोडस ऑपरेंटीबद्दल माहिती दिली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, 'जिथे कट पूर्ण करायचा आहे त्या ठिकाणी रेकी पुजारी गँगचे सदस्य करतात. इमारतींच्या सिक्युरिटीशी ओळख करून स्वत: तिथे नोकरी करतात. या आरोपींचे आंतरराष्ट्रीय संबंध असून एक आरोपी इंजिनीअरींग डिप्लोमा करत आहे.'
अटक केलेल्या आरोपींकडून आठ पिस्तूल आणि 15 काडतूस जप्त करण्यात आले आहेत. तसेच, पोलिसांनी त्यांची बाईक आणि मोबाईलदेखील जप्त केला आहे. या आरोपींना 28 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.