आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉक्टर होण्याचे स्वप्न बघणारी बिपाशा कशी वळाली अभिनयाकडे, जाणून घ्या FACTS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडची स्मार्ट अभिनेत्री बिपाशा बसु दीर्घकाळापासून फिल्म इंटस्ट्रीमध्ये काम करत आहे. तिने वयाच्या 17व्या वर्षी मॉडलिंग करिअरला सुरूवात केली होती. तिच्या रंगावरून आणि लुक्सवरून तिला कधीच वाटले नव्हते, की ती मॉडलिंग आणि अभिनय करेल. कदाचित तिच्या नशीबात हे क्षेत्र लिहलेले असावे.

खास गोष्ट आहे, की आज (7 जानेवारी) बिपाशा बसुचा वाढदिवस आहे. ती आज 35 वर्षाची झाली आहे. बिपाशाच्या खासगी आयुष्यावर एक नजर टाकली, तर तिचा जन्म नवी दिल्लीमध्ये झाला आहे आणि बंगाली आहे. त्यानंतर बिपाशाचे कुटुंब कोलकात्याला स्थायिक झाले होते. शालेय जीवनात बिपाशा एक चांगली विद्यार्थीनी होती, परंतु मॉडलिंगच्या जगात आल्यानंतर ती शिक्षण पूर्ण करू शकली. याची तिला खंत आहे.

फक्त 16व्या वर्षी बिपाशाने गोदरेज सिंथॉल सुपरमॉडल स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर 2001मध्ये तिने अब्बास मस्तानीच्या 'अजनबी' सिनेमामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. परंतु बिपाशाला खरी ओळख विक्रम भट्टच्या 'राज' सिनेमामधून मिळाली या सिनेमासाठी तिला फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला होता.

बिपाशा बसुच्या वाढदिवसानिमित्त या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला या बंगाली मुलीच्या आयुष्याशी निगडीत काही माहीत नसलेल्या रंजक गोष्टी सांगणार आहेत. पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या 'बिल्लू राणी'विषयीचे RARE FACTS...