आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS : 'दुनियादारी'च्या पडद्यामागे घडलेल्या या रंजक गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत का ?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सत्तरीच्या दशकापासून तरुणाईला झपाटून टाकणार्‍या सुहास शिरवळकर यांच्या 'दुनियादारी' या कादंबरीवर आधारित सिनेमाने मराठी चित्रपटसृष्टीत नवीन इतिहास रचला आहे. या सिनेमाने अवघ्या 45 दिवसांत 22 कोटींचा व्यवसाय केला आहे. यापूर्वी मी शिवाजी राजे भोसले बोलतोय या सिनेमाने शंभर दिवसांत 23 कोटींचा बिझनेस केल्याचा रेकॉर्ड होता. मात्र दुनियादारीने हा आकडा केवळ 45 दिवसांतच गाठला आहे.

दिग्या, श्रेया, उम्या या पात्रांसह आता 70 एमएमच्या स्क्रीनवर अवतरलेली दुनियादारी प्रेक्षकांना भावली आहे. 19 जुलै रोजी थिएटरमध्ये दाखल झालेला हा सिनेमा रिलीजच्या दीड महिन्यानंतरही महाराष्ट्रभरात साडे चारशे शोजबरोबर सुरु आहे.

अभिनेता स्वप्निल जोशी, अंकुश चौधरी, जितेंद्र जोशी, उदय सबनीस, उदय टिकेकर, सुशांत शेलार, सई ताम्हणकर, ऊर्मिला कानिटकर, वर्षा उसगावकर, रिचा परियाली योगेश शिरसाट या कलाकारांच्या प्रमुख भूमिका या सिनेमात आहेत.

सिनेसृष्टीत नवीन इतिहास रचणा-या या सिनेमाच्या पडद्यामागील काही खास गोष्टी आम्ही तुम्हाला सांगत आहोत. या गोष्टी कदाचितच तुम्हाला ठाऊक असतील. EXCLUSIVE : 'दुनियादारी'चा नवा विक्रम, 45 दिवसांत जमवला 22 कोटींचा गल्ला

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या 'दुनियादारी' या सिनेमाविषयीच्या तुम्हाला ठाऊक नसलेल्या खास गोष्टी...