आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Unknown Facts : उदरनिर्वाहासाठी वयाच्या 12 व्या वर्षी ट्रॅव्हल एजन्सीत श्वेताने केले होते काम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्रः श्वेता तिवारी)

छोट्या पडद्यावरची प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी आपला 34वा वाढदिवस साजरा करत आहे. श्वेता मुळची उत्तर प्रदेशातील प्रतापगडची आहे. 1999 साली आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात करणा-या श्वेताने मॉडेलिंग, अँकरिंग आणि टीव्ही प्रोड्युसरच्या रुपात काम केले आहे. स्टार प्लस वाहिनीवरील 'कसौटी जिंदगी की' या मालिकेमुळे श्वेता ख-या अर्थाने लाईमलाईटमध्ये आली. या मालिकेनंतर श्वेता अनेक रिअ‍ॅलिटी शोजमध्ये झळकली. बिग बॉसच्या चौथ्या पर्वाची ती विजेती ठरली.
आज श्वेताच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आम्ही तुम्हाला तिच्या आयुष्यातील अज्ञात गोष्टी सांगत आहोत...
वयाच्या 12 वर्षी केले होते ट्रॅव्हल एजन्सीत काम...
श्वेता मुंबईतच लहानाची मोठी झाली. आपल्या खासगी आयुष्यात श्वेताने अनेक चढउतार बघितले. ग्लॅमर दुनियेत स्वतःचे स्थान निर्माण करण्यासाठी तिने भरपूर संघर्ष केला आहे. खेळायच्या वयात असताना म्हणजे वयाच्या 12 वर्षी श्वेताने उदरनिर्वाहासाठी एका ट्रॅव्हल एजन्सीमध्ये काम केले होते. कामाच्या मोबदल्यात तिला पाचशे रुपये मिळायचे.
'कलीरें'द्वारे अभिनयाला सुरुवात...
'कलीरें' या मालिकद्वारे श्वेताने आपल्या अभिनय करिअरला सुरुवात केली. त्यानंतर तिने 'कसौटी जिंदगी की' या मालिकेसाठी ऑडिशन दिले आणि मालिकेतील प्रमुख भूमिकेसाठी तिची निवड झाली. या मालिकेमुळे श्वेता घराघरांत पोहोचली. या मालिकेमुळेच श्वेता छोट्या पडद्यावरील लोकप्रिय चेहरा ठरली.
वयाच्या 18व्या वर्षी लग्न...
श्वेताने वयाच्या केवळ अठराव्या वर्षी राजा चौधरीबरोबर लग्न केले होते. राजा भोजपुरी चित्रपटांचा निर्माता आणि अभिनेता आहे. राजा आणि श्वेताची एक मुलगी असून तिचे नाव पलक आहे. मात्र लग्नाच्या काही वर्षांतच दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले. राजाने श्वेताला मारहाण केल्याच्या बातम्या आल्या होत्या. श्वेताने राजावर आरोप लावला होता, की तो तिला मारहाण आणि अश्लील शिवीगाळ करतो. राजाच्या विक्षिप्त वागण्याला कंटाळून श्वेता त्याच्यापासून विभक्त झाली. दोघांचा कायदेशीररित्या घटस्फोट झाला आहे. राजापासून वेगळे झाल्यानंतर श्वेता आपल्या मुलीचे संगोपन एकटीच करत होती. याचदरम्यान श्वेताला बिग बॉस या शोची ऑफर मिळाली. श्वेताने ही ऑफर स्वीकारली. बिग बॉसच्या चौथ्या पर्वाची श्वेता विजेतीसुद्धा ठरली. रंजक गोष्ट म्हणजे श्वेतापूर्वी कुठल्याही फिमेल कंटेस्टंटने या शोचे विजेतेपद मिळवले नव्हते.
दुस-या लग्नाचा घेतला निर्णय...
पहिले लग्न अयशस्वी ठरल्यानंतर श्वेताने दुसरे लग्न करण्याचा निर्णय घेतला. श्वेताने टीव्ही अभिनेता अभिनव कोहलीची निवड आपल्या जोडीदाराच्या रुपात केली. गेल्या साडे तीन वर्षांपासून श्वेता अभिनवला ओळखत होती. गेल्यावर्षी जुलै महिन्यात या दोघांचे लग्न झाले. श्वेताच्या मुलीबरोबर अभिनवची चांगली ट्युनिंग आहे. हे तिघेही आपल्या आयुष्यात आनंदी आहेत.
श्वेताला आमच्याकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि छायाचित्रांमध्ये पाहा श्वेताच्या खासगी आयुष्याची खास झलक...