आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कपूर घराण्यातील हे सदस्य, कुणी ठरले Flop तर कुणी राहिले सिनेसृष्टीपासून लांब

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- (L) शशी कपूर यांचा मुलगा करण कपूर, शम्मी कपूर यांचा मुलगा आदित्य आणि त्यांची मुलगी कंचन कपूर देसाई)

बॉलिवूडमध्ये शो मॅन म्हणून ओळखले जाणारे राज कपूर यांची 14 डिसेंबर (जन्म- 14 डिसेंबर 1924) रोजी 90 वी बर्थ एनिव्हर्सरी होती. राज कपूर यांना कपूर घराण्यातील सर्वात यशस्वी अभिनेता म्हणून ओळखले जाते. त्यांनी केवळ अभिनयातच नव्हे तर दिग्दर्शन क्षेत्रातसुद्धा नाव कमावले होते.
राज कपूर यांच्याशिवाय शशी कपूर, शम्मी कपूर, ऋषी कपूरसह अनेक सदस्य फिल्मी दुनियेत कार्यरत आहेत. मात्र त्यांच्या कुटुंबातील काही सदस्य असे आहेत, ज्यांनी सिनेमांपासून लांब राहणे पसंत केले. तर काही येथे फ्लॉप ठरले. यामध्ये ऋषी कपूर यांचे धाकटे भाऊ राजीव कपूर, त्यांचे काका शशी कपूर आणि शम्मी कपूर यांच्या मुलांचा समावेश आहे.

1931 मध्ये पृथ्वीराज कपूर यांनी फिल्मी दुनियेत पाऊल ठेवले होते. तेव्हापासून त्यांच्या अनेक पिढ्या इंडस्ट्रीत आल्या.

ही आहे पृथ्वीराज कपूर यांची वंशवेल...
पृथ्वीराज कपूर+रमसमी मेहरा कपूर- मुले- राज कपूर, शम्मी कपूर, शशी कपूर, उर्मिला कपूर

राज कपूर+कृष्णा- मुले- रणधीर कपूर, ऋतु नंदा, ऋषी कपूर, रीमा जैन, राजीव कपूर

शम्मी कपूर+गीता बाली- मुले- आदित्य कपूर आणि कंचन कपूर देसाई

शशि कपूर+जेनिफर केंडल- मुले- करण कपूर, कुणाल कपूर, संजना कपूर

रणधीर कपूर+बबिता- मुली- करिश्मा कपूर (पती - संजय कपूर) आणि करीना कपूर (पती - सैफ अली खान)

रितू नंदा+राजन नंदा- मुले- निखिल नंदा (पत्नी - श्वेता बच्चन नंदा(अमिताभ बच्चन यांची लेक) आणि नताशा नंदा

ऋषी कपूर+नीतू सिंह- मुले- रिद्धिमा साहनी (पती - भरत साहनी) आणि रणबीर कपूर

रीमा जैन+मोहित जैन- मुले- अरमान आणि आदर जैन

राजीव कपूर+आरती सभरवाल

पुढील स्लाईड्समध्ये भेटा कपूर फॅमिलीतील अशा काही सदस्यांना ज्यांना तुम्ही कदाचितच ओळखत असाल...