आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PIX:करिश्मा-करीनासोबत खेळून मोठा झाला रणबीर, पाहा बालपणी किती गोंडस दिसायचा हा \'रॉकस्टार\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरची बालपणीची छायाचित्रे, वडील ऋषी कपूर, आई नीतू कपूर आणि बहीण रिद्धिमासोबत रणबीर)
मुंबईः बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा उद्या म्हणजे 28 सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे. 28 सप्टेंबर 1982 रोजी रणबीरचा फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात मोठे घराणे असलेल्या कपूर घराण्यात जन्म झाला. रणबीरच्या वाढदिवसाचे औचित्य साधत divyamarathi.com आपल्या वाचकांना त्याची खास छायाचित्रे दाखवत आहे. रणबीरची ही छायाचित्रे कदाचितच तुम्ही यापूर्वी बघितली असावीत.
या छायाचित्रांमध्ये रणबीर त्याचे आईवडील, अभिनेता ऋषी कपूर आणि अभिनेत्री नीतू सिंहसोबत दिसत आहे. तर इतर काही छायाचित्रांमध्ये तो त्याचे आजोबा आणि बॉलिवूडचे शोमॅन म्हणून प्रसिद्ध असलेले राजकपूर यांच्यासोबत दिसत आहे. एका छायाचित्रात बिग बी चिमुकल्या रणबीरचे लाड करताना दिसत आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये तुम्ही घरापासून ते शाळेपर्यंत आणि आउटिंगवरील रणबीरची वेगवेगळ्या वयातील आणि अंदाजीतल छायाचित्रे बघाल. ही छायाचित्रे रणबीर कपूर डॉट नेटवरुन घेण्यात आली आहेत. रणबीर कपूर घराण्यातील चौथी पिढी आहे. संजय लीला भन्साळींच्या 'सावरियां' या सिनेमाद्वारे आपल्या करिअरची सुरुवात करणा-या रणबीरने अल्पावधीतच स्टारडम प्राप्त केले. तो आज बॉलिवूडमधील मोस्ट डिमांडिंग हीरो ठरला आहे.
एखाद्या सिनेमात त्याचे असणे यशाची गॅरंटी बनले आहे. रणबीरने कमर्शिअल सिनेमांसोबतच ऑफबीट कलात्मक सिनेमांमध्येही आपल्या अभिनयाची चुणुक दाखवली आहे. आत्तापर्यंतच्या आपल्या करिअरमध्ये रणबीरने अनेक महत्त्वपूर्ण अवॉर्ड नावी केले आहेत. त्याच्या खात्यात अनेक ब्लॉकबस्टर सिनेमे जमा आहेत.
रणबीरची बालपणीची छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...