आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Remembrance: ताकदीच्या अभिनेत्यासोबतच गायक, लेखकसुद्धा होते सतीश तारे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते सतीश तारे यांची आज (गुरुवारी) पहिली पुण्यतिथी आहे. गेल्यावर्षी 3 जुलै रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला होता. सतीश तारे यांनी अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमधून आपल्या कसदार अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. अभिनेत्याबरोबरच लेखक आणि गायक म्हणूनही ते प्रसिद्ध होते. 'सारेगमप'मधून ते गायक म्हणून प्रेक्षकांच्या समोर आले होते.
सतीश तारे यांनी आपल्या करिअरची सुरुवात बालकलाकाराच्या रुपात केली होती. वडील जयंत तारे यांच्या 'ती फुलराणी' या नाटकात तारे यांनी बालकलाकार म्हणून काम केलं होतं. ती फुलराणी, जादू तेरी नजर, सगळं कसं गुपचुप, मोरुची मावशी, ऑल लाईन क्लीअर, विच्छा माझी पुरी करा, श्यामची आई ही त्यांची काही निवडक गाजलेली नाटकं आहेत.
नवरा माझा नवसाचा, बाई ला हो बायकोला खो, सत्या, बालक पालक हे त्यांचे अलीकडच्या काळात रिलीज झालेले सिनेमे होते. 'मोरुची मावशी' हे नाटक दहा वर्षांनी रंगभूमीवर पुन्हा दाखल झाल्यानंतर या नाटकात विजय चव्हाण यांनी गाजवलेली मावशीची भूमिका सतीश तारे यांनी साकारली होती. झी मराठी वाहिनीवरील 'फू बाई फू'च्या माध्यमातून ते घराघरांत पोहोचले. या शोच्या चौथ्या पर्वाचे सतीश तारे विजेते ठरले होते. 'एका लग्नाची दुसरी गोष्ट' या मालिकेत त्यांनी साकारलेल्या माऊलीच्या भूमिकेचं कौतुक झालं होतं. सतीश तारे यांना विविध प्रकारची वाद्ये वाजवता येत होती. विनोदाच्या अचुक टायमिंगसाठी सतीश तारे यांना ओळखलं जात होतं.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा सतीश तारे यांची विविध रुपे..