(सिनेमाच्या शूटिंगवेळी जॉन अब्राहम, परेश रावल आणि श्रुती हसन)
मुंबईः अनीस बज्मी यांच्या दिग्दर्शनात तयार होत असलेल्या आगामी 'वेलकम बॅक' या सिनेमाच्या शूटिंगची छायाचित्रे लीक झाली आहेत. ही छायाचित्रे अबू धाबी येथील अमीरात पॅलेसची आहेत.
'वेलकम बॅक' हा 2007मध्ये रिलीज झालेल्या 'वेलकम' या सिनेमाचा सिक्वेल आहे. 'वेलकम'मध्ये
अक्षय कुमार,
कतरिना कैफ लीड रोल मध्ये होते. तर 'वेलकम बॅक'मध्ये आता जॉन अब्राहम, श्रुती हसन मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. याशिवाय अनिल कपूर, नाना पाटेकर, परेश रावल यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका या सिनेमात असणार आहेत. 'वेलकम'मध्येही हे तिघांनी काम केले होते. 'वेलकम'मध्ये फिरोज खान यांनी साकारलेली डॉनची व्यक्तिरेखा आता नसीरुद्दीन शाह 'वेलकम बॅक'मध्ये साकारणार आहेत.
पुढील वर्षी 23 जानेवारीला हा सिनेमा
बॉक्स ऑफिसवर दाखल होणार आहे. सिनेमाच्या रिलीजपूर्वीच नसीरुद्दीन शाह यांचा सिनेमातील फस्ट लूक समोर आला आहे. याशिवाय लीक झालेल्या या छायाचित्रांमध्ये जॉन अब्राहम, श्रुती हसन, परेश रावल, अनिल कपूर आणि नाना पाटेकरसुद्धा दिसत आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा 'वेलकम बॅक'च्या शूटिंगची लीक झालेली छायाचित्रे...