मुंबईः 'किल-दिल' या आगामी सिनेमातील टायटल ट्रॅकनंतर आता त्यातील दुसरे गाणे 'स्वीटा...' हे बुधवारी रिलीज करण्यात आले. या गाण्यात रणवीर सिंह परिणीती चोप्राला इम्प्रेस करताना दिसतोय. या गाण्याच्या शेवटी परिणीती रणवीरला किस करतानासुद्धा दिसत आहे. या गाण्यात रणवीर फनी अंदाजात डान्स करताना दिसतोय. बातमी आहे, की या गाण्यानंतर म्हणे, रणवीरने परिणीतीला 'स्वीटा' हे निकनेम दिले आहे.
हे गाणे प्रसिद्ध गीतकार गुलजार यांनी लिहिले असून शंकर-एहसान-लॉय या त्रयींनी ते संगीतबद्ध केले आहे. पाकिस्तानी गायक अदनान सामी यांनी हे गाणे गायले आहे. 'किल-दिल' हा सिनेमा दिग्दर्शक शाद अली यांनी दिग्दर्शित केला असून आदित्य चोप्रा निर्माते आहेत. रणवीर आणि परिणीतीसह या सिनेमात गोविंदा आणि अली जाफर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका या सिनेमात आहेत. येत्या 14 नोव्हेंबर रोजी सिनेमा रिलीज होणार आहे.
पुढील स्लाईड्समध्ये क्लिक करुन छायाचित्रांमध्ये पाहा 'स्वीटा...' या गाण्यातील रणवीर आणि परिणीतीची केमिस्ट्री आणि शेवटच्या स्लाईडमध्ये गाण्याचा व्हिडिओ...