आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'नगरसेवक - एक नायक'मध्ये उपेंद्र लिमये

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठी सिनेमांपासून ते बॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारा अभिनेता उपेंद्र लिमये आता 'नगरसेवक - एक नायक' या सिनेमाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या आगामी मराठी सिनेमात उपेंद्र मल्हार शिंदे नावाच्या सर्वसामान्य तरुणाच्या भूमिकेत झळकणार आहे. हा तरुण नगरसेवकपदाच्या माध्यमातून समाजाचा विकास घडवण्याची प्रतिज्ञा करतो.

राजकीय डावपेच, भावनिक संघर्ष, जीवनातील चढउतार, वैयक्तिक पातळीवर वाट्याला आलेली सुख-दुःखे, समाजाच्या विकासाठी उदात्त भावना यांसारख्या विविध पैलूंचा मागोवा घेत 'नगरसेवक - एक नायक'चे कथानक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेईल.

दिपक कदम दिग्दर्शित या सिनेमात उपेंद्र लिमयेसह नेहा पेंडसे, सयाजी शिंदे, गणेश यादव, संजय खापरे यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. सध्या मुंबईत या सिनेमाचे चित्रिकरण सुरु असून लवकरात लवकर हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आणण्याचा निर्मात्यांचा मानस आहे.