आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Upendra Limaye News In Marathi, Yelo, Marathi Film Industry, Divya Marathi

वास्तव दृष्टी देणारा ‘यलो’ चित्रपट - अभिनेता उपेंद्र लिमये

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - विशेष मुलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणारा आणि धमाल मजेतून संदेश मनात उतरवून जाईल असा ‘यलो’ चित्रपट आहे. अफलातून विषयाची सर्मपक मांडणी करण्यात आली आहे. या पद्धतीचा हा पहिलाच प्रयोग आहे, असे मत प्रख्यात सिनेअभिनेते उपेंद्र लिमये यांनी व्यक्त केले.


‘यलो’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी चित्रपटाच्या टीमने ‘दिव्य मराठी’ कार्यालयाला भेट दिली. या वेळी लेखक अंबर हडप, गायिका अपेक्षा दांडेकर, सिनेमातील स्टार गौरी गाडगीळ (विशेष मुलगी) यांची उपस्थिती होती. चित्रपटाच्या विविध पैलूंवर सर्वांनी चर्चा केली. उपेंद्र म्हणाले, या चित्रपटातील भूमिका माझ्या आजवरच्या करिअरमधील सवरेत्तम आहे. विशेष मुलांवरती आपल्याकडे फारशी चित्रपटनिर्मिती झालेली नाही. या मुलांचे जगणे आणि आयुष्याविषयीचा सकारात्मक दृष्टिकोन सामान्यांनाही चैतन्याने जगण्याची उभारी देणारा आहे. गौरीसोबत अभिनयाचा अनुभव चमत्कारिक होता. पाण्याखाली केलेले चित्रीकरण हा मराठीतील पहिलाच प्रयोग आहे.
या चित्रपटात अभिनय करणे गौरीप्रमाणेच आमच्या सर्वांसाठीही आव्हान होते. तिच्याशी लय जुळवून घेत आम्ही काम केले. गौरी विशेष ऑलिम्पिक्सची रौप्यपदकाची मानकरी आहे. चित्रीकरणादरम्यान ती विविध स्पर्धांत सहभागी होऊन पुन्हा चित्रीकरणासाठी परतायची. सिडनीला जाऊनही ती उत्तुंग कामगिरी करून आली.