आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Urmila Matondkar Birthday: Bollywood Actresses Flop Comebacks

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'रंगीला गर्ल'सह या 5 अॅक्ट्रेसेसचे बॉलिवूडमधील कमबॅक ठरले Flop

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः अभिनेत्री उर्मिला मातोंडकर)

बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिचा आज 41 वा वाढदिवस आहे. 90च्या दशकात उर्मिलाने बी टाऊनमध्ये एन्ट्री घेतली होती. अनेक हिट सिनेमे तिच्या नावी जमा आहेत. 4 फेब्रुवारी 1974 रोजी मुंबईत उर्मिलाचा जन्म झाला. बालकलाकाराच्या रुपात तिने पहिल्यांदा कॅमेरा फेस केला. सध्या ती बॉलिवूडपासून दूर आहे.
फिल्मी करिअर..
उर्मिलाने 1980मध्ये 'कलयुग' या सिनेमाद्वारे बालकलाकाराच्या रुपात बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. मात्र 1983 मध्ये रिलीज झालेल्या मासूम या सिनेमाद्वारे ती प्रकाशझोतात आली होती. त्यानंतर 1991मध्ये 'नरसिंहा' या सिनेमाद्वारे उर्मिला लीड अॅक्ट्रेसच्या रुपात पडद्यावर अवतरली. राम गोपाल वर्मांच्या 'रंगीला' या सिनेमाद्वारे उर्मिलाला एका रात्रीत स्टारपद मिळाले.
'रंगीला'ने बदलली करिअरची दिशा...
रामगोपाल वर्मांच्या या सिनेमामुळे उर्मिलाला बॉलिवूडमध्ये 'रंगीला गर्ल'च्या नावाने ओळखले जाऊ लागले. 'रंगीला'नंतर ती रामगोपाल वर्मांची आवडती अभिनेत्री बनली होती. उर्मिलाने आपल्या करिअरमध्ये ‘चमत्कार’ (1992), ’रंगीला’ (1995), ’जुदाई’ (1997), ’सत्या’ (1998), ’मस्त’ (1999), ’खूबसूरत’ (1999), ’प्यार तूने क्या किया’ (2001), ’भूत’ (2003) यांसारखे अनेक हिट सिनेमे केले.
कमबॅक ठरले फ्लॉप...
आता उर्मिला लाइमलाइटपासून दूर झाली आहे. 2005 ते 2008 याकाळात तिने काही सिनेमांमध्ये छोटेखानी भूमिका साकारल्या होत्या. 2008मध्ये हिमेश रेशमियाच्या 'कर्ज' या सिनेमात ती झळकली होती. या सिनेमाला उर्मिलाचे कमबॅक म्हटले गेले होते. मात्र हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. त्यांनतर तिने 'EMI' या सिनेमातही काम केले. मात्र हाही सिनेमा अपयशी ठरला.
मराठी सिनेसृष्टीकडे वळवला मोर्चा...
हिंदीतील कमबॅक फ्लॉप ठरल्यानंतर उर्मिलाने आपला मोर्चा मराठी सिनेसृष्टीकडे वळवला. सुजय डहाके दिग्दर्शित 'आजोबा' या सिनेमात ती झळकली. या सिनेमाची बरीच चर्चा झाली होती. मात्र या सिनेमाला अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या अशाच आणखी काही अभिनेत्रींविषयी ज्यांचे कमबॅक ठरले फ्लॉप...